video viral esakal
देश

Viral Video: वाजतगाजत निघाली गायीची अंत्ययात्रा; कुटुंबीय म्हणाले, आमची आई गेली

गाईला कुटुंबातील सदस्याप्रमाणे अखेरचा निरोप दिला

सकाळ डिजिटल टीम

Madhya Pradesh: माणूस आणि प्राणी यांच्यातील नाते जगावेगळे आहे. आजकाल अनेक वेळा अनोखे व्हिडीओ समोर येत आसतात, ज्यात माणूस आणि प्राणी यांच्यातील हे प्रेम उदाहरण बनते. असाच काहीसा प्रकार शाजापूरमध्ये घडला, जिथे एका गायीच्या मालकाने तिच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्याप्रमाणे अखेरचा निरोप दिला.

भंवर सिंह खिची यांच्याकडे रानू नावाची 20 वर्षाची गाय होती. या गायीवर संपूर्ण कुटुंबाचे खूप प्रेम होते. ती घरातील सदस्यासारखी होती. 1 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला तेव्हा कुटुंबाने आणि संपूर्ण परिसराने हिंदू विधी प्रमाणे गायीच्या शवाला 100 हून अधिक साड्या नेसवल्या. प्रत्येकजण येऊन तिच्याबद्दल आदर व्यक्त करत होता.

अखेरच्या दर्शनानंतर गाईची अंत्ययात्रा पालिकेच्या वाहनातून बँड-बाजा वाजवत काढण्यात आली. घरातील आणि परिसरातील सर्व लोकांचे डोळे पाणवले होते. जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून मृतदेह पुरण्यात आला. भंवर सिंह म्हणाले की, राणू आमच्या कुटुंबासाठी 'आई' सारखी होती. ती पण सगळ्या लोकांची लाडकी होती आणि सगळे तिला खूप प्रेमाने राणू म्हणायचे.

कोणीही तिला भेटायला आले की शेपूट हलवत ती खूप प्रेमाने भेटत असे. कुटुंब दु:खी आहे. आमच्या कुटुंबातून आमची गाय नाही तर, आमची आई गेली आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्याप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

FDA Crime : सणासुदीच्या काळात ‘एफडीए’ची कारवाई; ५६ लाखांचा अन्नसाठा जप्त, पुणे विभागातील १२ आस्थापनांवर छापे

SCROLL FOR NEXT