Love Jihad Maharashtra esakal
देश

Love Jihad : देशातील चार राज्यांमध्ये लागू झालेला लव्ह जिहाद कायदा नेमका काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः भाजपशासित पाच राज्यांमध्ये लव्ह जिहाद कायदा लागू आहे. श्रद्धा मर्डर केसनंतर पु्न्हा या कायद्याची चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्रात हा कायदा आणण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या असून त्यासाठी समितीदेखील गठीत करण्यात आलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याचा प्रस्ताव येऊ शकतो.

लव्ह जिहादचा कायदा उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लागू आहे. उत्तर प्रदेशात २०२०मध्ये पहिल्यांदा कायदा लागू झाला.

आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकरचा खून करुन तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या घटनेने देश हादरुन गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लव्ह जिहाद या कायद्याविषयी चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात हा कायदा येण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

दरम्यान, काल श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन धर्मजागरण गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या यांचीही उपस्थिती होती. एकूणच सध्या लव्ह जिहाद प्रकरणावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कायदा मोडल्यास काय?

उत्तर प्रदेशमध्ये या कायद्यांतर्गत १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यामध्ये केवळ लग्नासाठी केलेलं धर्मांतर अमान्य आहे. खोटं बोलून, धोका देऊन झालेलं धर्मांतर हा गुन्हा आहे. ज्या प्रकरणामध्ये स्वेच्छा धर्मांतर करावयाचे आहे त्या प्रकरणात दोन महिने अगोदर मॅजिस्ट्रेटना माहिती द्यावी लागेल. या गुन्ह्यांतर्गत १५ हजार रुपयांच्या दंडासह एक ते पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: मुंबईत भरतीचा इशारा; अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT