BJP Leader Raju Jha Shot Dead esakal
देश

BJP Leader: मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला

रुपेश नामदास

BJP Leader Raju Jha Shot Dead: पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील शक्तीग्रहात भाजप नेते राजू झा यांची काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुर्गापूर येथील व्यापारी राजू झा असे मृताचे नाव आहे. ते काही सहकाऱ्यांसोबत कोलकात्याला जात होते दरम्यान, शक्तीगढ परिसरातील एका मिठाईच्या दुकानाबाहेर अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला.

वर्धमानचे एसपी कमनासिस सेन यांनी सांगितले की, कारमध्ये राजू झा यांच्यासह तीन जण प्रवास करत होते. हत्येचं कारण अजून समजू शकला नाही. पुढील तपास सुरू आहे. राजू झा यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू झा आपल्या एसयूव्ही गाडीमध्ये दुकानाबाहेर थांबले होते तेव्हा एका कारमध्ये दोन व्यक्ती आले. एका आरोपीने रॉडने कारची काच फोडली, तर दुसऱ्याने गोळीबार सुरू केला. यावेळी गोळीबाराच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. झा यांच्यासोबत उपस्थित असलेले इतर लोकही जखमी झाले.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. डाव्या आघाडीच्या राजवटीत झा यांच्यावर सिलपंचालमध्ये अवैध कोळसा व्यवसाय चालवल्याचा आरोप होता. तृणमूल सरकारने त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; धरणात 92.70 टीएमसी पाणीसाठा : पावसाचा जोर ओसरला

Gold Price Forecast : अमेरिका-इराण संघर्षाचा सोन्या-चांदीवर परिणाम; सोन्याच्या दरावर दबाव कायम, भाव आणखी वाढणार?

Amit Shah NUC FDC: राज्यात नागरी सहकारी वित्त महामंडळ, अमित शहा यांची घोषणा, शहरी बँकिंग क्षेत्राला नवसंजीवनी

Marathi News Live Updates : कोयना धरणाचे दरवाजे एक फुटावर; 92.70 टीएमसी पाणीसाठा

PMC Tree Cutting Issue : बांधकामासाठी ५०० झाडं तोडली, पण ३५०० कुठे लावली? नियमबाह्य वृक्षतोडीवरून पुणे महापालिकेची कोंडी

SCROLL FOR NEXT