puc 
देश

PUC सर्टिफिकेट नसेल तर आता RC जप्त; 1 जानेवारीपासून वाहतुकीचे नियम कडक

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : प्रदुषणासंदर्भातील वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाबाबतची कारवाई अधिक कठोर करण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. येत्या नवीन वर्षात एक जानेवारीपासून जर वाहनधारकाकडे पीयूसी सर्टीफिकेट नसेल तर त्याच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जप्त करण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. 

याबाबतची सुचना रस्ते वाहतुक मंत्रालयाने 27 नोव्हेंबर रोजी काढली आहे. यानुसार, पीयूसी सिस्टीम ऑनलाइन करण्यापूर्वी सूचना मागविण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया दोन महिने सुरु राहिल. नव्या सिस्टीमनुसार, वाहन मालकाची माहिती मोटार व्हेईकल डेटाबेसमध्ये अपलोड केली जाईल. यामुळे पीयूसी सर्टिफिकेटशिवाय लोकांना त्यांचे वाहन फिरवता येणार नाही. 

वाहनचालकाला त्याचा मोबाईल नंबर द्यावा लागेल ज्यावर एक ओटीपी येईल. पीयूसी सर्टिफिकेट मिळणाऱ्या सेंटरवर हा ओटीपी दिल्याशिवाय सर्टिफिकेट मिळणे अशक्य असणार आहे. यामुळे या प्रक्रियेत काही घोटाळा होण्याच्या शक्यता आता थांबणार आहेत. या नव्या प्रस्तावित सिस्टीमनुसार, निश्चित केलेल्या कालावधीनंतर पीयूसी सर्टिफिकेट पुन्हा नव्याने काढणे अनिवार्य ठरणार आहे. जर वाहनचालकाकडे पीयूसी सर्टिफिकेट नसेल तर त्या सात दिवसांचा वेळ दिला जाईल. जर या कालवधीतही सर्टिफिकेट काढले नाही तर त्या वाहनधारकाचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जप्त केले जाणार आहे. 

तसेच अधिकारी वाहनचालकाच्या वाहनाचून अधिक धूर निघतो का याची तपासणी करु शकणार आहेत. अशा चालकांनाही वाहनाच्या दुरुस्तीसाठी सात दिवसांची मुदत दिली जाणार आहे. हेच नियम कमिर्शियल व्हेईकल्सनाही लागू असणार आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अत्यंत धोकादायक पातळीवर गेलेल्या वायुप्रदुषणाला अटकाव घालण्यासाठी हे नियम कडक करण्यात आले आहेत. दिल्लीमध्ये काल शनिवारी पुन्हा हवेचा दर्जा घसरला होता. शहरातील सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स हा 231 होता.  तर शुक्रवारी तो 137 होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT