nia main.jpg 
देश

टेरर फंडिंगः काश्मीरमध्ये वृत्तपत्र, NGO च्या कार्यालयांवर एनआयएचे छापे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनआयए) पथकाने बुधवारी (दि.28) सकाळी काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे मारले आहेत. यामध्ये श्रीनगर आणि बडगामसारख्या परिसरांचाही समावेश आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंगप्रकरणी हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएकडून अनेक दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तपासणीत जे पुरावे मिळाले आहेत. त्याच्याच आधारावर हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते. 

एनआयएचे पथक सकाळी श्रीनगरला पोहोचले. त्यांच्याबरोबर पोलिस आणि सीआरपीएफचे पथकही होते. हे छापे स्थानिक वृत्तपत्र ग्रेटर काश्मीर ट्रस्टचे कार्यालय, सोनवरमध्ये खुर्रम परवेज आणि एथ्राऊट एनजीओच्या एचबी हाऊस बोट नेहरु पार्क परिसरातील कार्यालय आणि निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. यावेळी कोणत्याही बाहेरील व्यक्तीस आत येण्यास मनाई करण्यात आली होती. 

गेल्या अनेक दिवसांपासून एनआयए सीमेपलीकडून होत असलेल्या टेरर फंडिंग प्रकरणाचा तपास करत आहे. काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीला काश्मीरमधून पकडण्यात आले होते. त्याच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतरच अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRAN-AMERICA WAR REASON : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला का केला? 'या' 5 कारणांमुळे सुरू झालंय भीषण युद्ध, काळीज पिळवटणारे व्हिडिओ

Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

US, Israel war on Iran : इस्त्रायल- इराण युद्धाचा फटका, पुण्यातून दुबईसाठी विमान सेवा २ दिवस राहणार बंद, अनेक प्रवासी अडकले

Chembur Accident: चेंबूर मजूर मृत्यू प्रकरण! विकसकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, महापौरांचे निर्देश

Latest Marathi News Update : हिंगोली शहरात उभी असलेल्या कारने घेतला अचानक पेट

SCROLL FOR NEXT