नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर-एनआयसी sakal
देश

एनआयसीवर खापर फोडत मोदींचे छायाचित्र हटविले

राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून (नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर-एनआयसी) हे चुकून घडल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत इ-मेलवर तळटीप म्हणून ‘सबका साथ सबका विश्वास’ या घोषवाक्याच्या जोडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यावरून उद्भवलेला वाद अखेर मिटला आहे. राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून (नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटर-एनआयसी) हे चुकून घडल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयानेच ते हटविण्याचा आणि त्याऐवजी आपल्या इमारतीचे छायाचित्र तेथे छापण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाला इ-मेल सेवा पुरविण्याचे काम एनआयसी करते. त्यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीतून काही जणांनी वाद निर्माण केला, असे सूत्रांनी सांगितले. काल उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या नोंदणी कार्यालयाच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली. घोषवाक्य आणि मोदींच्या छायाचित्राचा न्याययंत्रणेच्या कारभाराशी काहीही संबंध नसल्याचेही नमूद करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

Diwali Bank Holiday: दिवाळीच्या आठवड्यात महाराष्ट्रातील बँकाना तब्बल 3 दिवस सुट्टी! कोणत्या दिवशी बँका बंद राहणार? आत्ताच जाणून घ्या

Bogus Sports Certificate Fraud Vaibhav Chavan Beed : सत्याचा लढा जिवावर बेतला! न्याय मागणाऱ्या वैभवच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्यांवर अखेर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

SCROLL FOR NEXT