PM Narendra modi with Camera Sakal
देश

PM Narendra Modi: मोदींनी लेन्सचं कव्हर न काढताच चित्त्यांचे फोटो काढले? PHOTO व्हायरल

चित्त्यांचं भारतात आगमन झाल्यावर त्यांचे फोटो काढण्याचा मोह पंतप्रधानांनाही आवरला नाही.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त काल मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात आठ चित्ते आणण्यात आले आहेत. नामिबियाहून विशेष विमानाने आलेल्या या चित्त्यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते कुनो अभयारण्यात सोडण्यात आलं. यावेळी या चित्त्यांचे फोटो काढण्याचा मोह पंतप्रधानांना आवरता आला नाही. मात्र यावरुनच आता मोदी ट्रोल होऊ लागले आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने मोदींचा या चित्त्यांचा फोटो काढतानाचा एक फोटो शेअर करत खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्याचं कव्हर न काढताच फोटो काढले, असा दावा या नेत्याने केला आहे. भाजपानेही त्याचा दावा खोडून काढत प्रत्युत्तर दिलं आहे. तृणमूलचे खासदार जवाहर सरकार आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, सगळी आकडेवारी झाकून ठेवणं ही वेगळी गोष्ट आहे. पण कॅमेऱ्याची लेन्सही झाकून ठेवणं म्हणजे किती दूरदृष्टीचं काम आहे.

त्यावर भाजपाने लगेचच प्रत्युत्तर दिलं आहे. मोदींचा हा फोटो फेक असल्याचं भाजपाकडून सांगण्यात आलं आहे. भाजपा नेते सुकांता मुजुमदार यांनी हा कॅमेरा निकॉनचा असून त्यावरचं कव्हर कॅननचं असल्याचं दाखवून दिलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये ममता बॅनर्जींना टॅग करत ते म्हणतात की, तृणमूलचे खासदार निकॉनच्या कॅमेऱ्यावर कॅननचं कव्हर असणारा एडिटेड फोटो शेअर करत आहे. खोटा प्रचार करण्याचा हा खूपच वाईट प्रयत्न आहे. ममता बॅनर्जींनी किमान थोडी माहिती असणाऱ्यांना कामावर ठेवावं.

या सगळ्या प्रकारानंतर तृणमूलचे खासदार जवाहर यांनी लगेचच ट्वीट डिलीट केलं आहे. मात्र तोवर हे सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT