Nilesh Lanke meets Sharad Pawar in Pune esakal
देश

Nilesh Lanke: निलेश लंकेंना मदत लागल्यास आम्ही तयार; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

Nilesh Lanke: आमदार निलेश लंके यांनी आज शरद पवार यांची पुण्यात कार्यालयात भेट घेतली. निलेश लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ पुस्तकाचं आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालत प्रकाशन पार पडलं.

Sandip Kapde

Nilesh Lanke: आमदार निलेश लंके यांनी आज शरद पवार यांची पुण्यात कार्यालयात भेट घेतली. निलेश लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ पुस्तकाचं आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालत प्रकाशन पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी निलेश लंके यांचं स्वागत केलं. मात्र निलेश लंके यांच्या अधिकृत प्रवेशाबाबत कोणीही भाष्य केलं नाही. यावेळी शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पारनेरची जागा लढण्याचा विचार जेव्हा आमच्या मनात आला तेव्हा आणखी काही आमचे सहकारी होते. पण थोडी माहिती घेतल्यानंतर असे दिसून आले की, निलेश लंके यांची निवड केली. पारनेर हा दुष्काळी तालुका. तिथे एमआयडीसी आणली. कारखानदारी वाढवली. तिथे दुधाचा धंदाही वाढला.

या सगळ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. अत्यंत कष्ट करणारा म्हणून आम्ही लंकेकडे पाहतो. त्यांच्या विधानसभेच्या प्रचारालाही गेलो होतो. त्यांची बांधिलकी जनतेशी होती. लोकांच्यासाठी काम करतात त्यांनी मी प्रोत्साहन देतो. पक्षाच्या कार्यालयात ते आले त्यानिमित्तानं त्यांचे स्वागत करतो. सध्या दुष्काळाचे सावट आहे. तिथे चिकाटीनं काम करणाऱ्या लंकेसारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांना  मदत लागल्यास आम्ही तयार आहोत, असेही पवार यावेळी म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. याआधी अहमदनगरची जागा खूप चर्चेत आहे. खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आमदार निलेश लंके यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये दोन्ही गटांकडून कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात नीलेश लंके यांच्या पत्नीही सक्रिय दिसत आहेत. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे याही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला समाजाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके याही शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघ कव्हर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dhule Traffic : धुळे वाहतूक कोंडी सुटली! गडकरींच्या निर्देशानंतर फागणे-धुळे वळण रस्त्याची एक बाजू १५ ऑक्टोबरपर्यंत खुली होणार

District Judge Dismissed: माेठी बातमी!'सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ'; तीन ऑक्टोबरपासून पदमुक्त, नेमकं काय कारण?

Irani Cup 2025: विदर्भाने पटकावला विजेतेपदाचा मान; इशान किशन, पाटिदार, ऋतुराजसारखे स्टार खेळाडू असलेल्या संघाला केलं पराभूत

SCROLL FOR NEXT