Rath Yatra Puri  
देश

Puri Rath Yatra: पुरी रथ यात्रेदरम्यान अपघात! भगवानाची मूर्ती अंगावर पडून 9 जण जखमी; Video

Rath Yatra Puri Jagannath temple Accident: पुरीमध्ये रथ यात्रा सुरू आहे. यावेळी अपघाताने भगवान बलभद्रची मूर्ती सेवकांच्या अंगावर पडली. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पुरीमध्ये भगवान बलभद्रची मूर्ती ( Lord Balabhadra) अंगावर पडून जगन्नाथ मंदिराचे किमान ९ सेवक जखमी झाले आहेत. पुरीमध्ये रथ यात्रा सुरू आहे. यावेळी अपघाताने भगवान बलभद्रची मूर्ती सेवकांच्या अंगावर पडली. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

रथामधून मूर्ती मंदिरामध्ये ठेवली जाणार होती. सेवकांनी मूर्तीला उचलले पण त्यांना ती आवरली नाही अन् ती अंगावर पडली. यात जवळपास ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वेन यांनी सांगितलं की, नऊ पैकी पाच जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे, तर इतर चार जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. पहंडी विधी करत असताना हा अपघात घडला. व्हिडिओ पाहून समजतंय की, ज्या सेवकांकडे भगवानाची मूर्ती सांभाळण्याची जबाबदारी होती. त्यांना मूर्ती आवरली नाही आणि हा अपघात घडला.

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी या घटनेबाबत काळजी व्यक्त केली आहे. कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांना घटनास्थळी तात्काळ भेट देण्याचे आदेश त्यांनी दिलेत. तसेच, सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितलं आहे. पुरी भगवान जगन्नाथ मंदिर हे राज्य सरकारच्या कायदा विभागाच्या अखत्यारीत येतं. मुख्यमंत्र्यांनी गंभीर जखमींच्या बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT