National Institute of Ocean Technology-NIOT 
देश

NIOT : समुद्री पाण्याचं पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर होणार, स्वदेशी तंत्रज्ञान विकसित

तंत्रज्ञाच्या मदतीने पिण्यायोग्य पाण्याचा यशस्वी प्रयोग लक्षद्वीप बेटावर यशस्वीपणे करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

तंत्रज्ञाच्या मदतीने पिण्यायोग्य पाण्याचा यशस्वी प्रयोग लक्षद्वीप बेटावर यशस्वीपणे करण्यात आला आहे.

पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण अधिक असले तरी त्यात गोडे पाणी कमी आणि खाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे खारे पाणी पिण्यासाठी वापरता यावे यासाठी मागील कित्येक वर्षांपासून यावर संशोधन सुरु आहे. (National Institute of Ocean Technology-NIOT)

दरम्यान, या संशोधनाला यश मिळाले असून समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यामुळे आता समुद्राच्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Dr.Jitendra Singh) यांनी दिली आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (National Institute of Ocean Technology-NIOT) या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर केले आहे. खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी लो प्रेशर थर्मल डीसालायनेशन (LTTD) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

तंत्रज्ञाच्या मदतीने पिण्यायोग्य पाण्याचा यशस्वी प्रयोग लक्षद्वीप बेटावर यशस्वीपणे करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता असल्याची माहिती डॉ. सिंह यांनी दिली आहे.

केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या कावारात्ती, अगाती आणि मिनीकॉय बेटांवर LTTD तंत्रज्ञानावर आधारित तीन डीसलायनेशन प्लांट विकसित करण्यात आले आहेत. यापैकी प्रत्येक LTTD प्लांटची दर दिवशी 1 लाख लिटर पिण्यायोग्य पाणी बनवण्याची क्षमता आहे.

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणाऱ्या निर्मिती प्रकल्पाची (डीसालायनेशन प्लांट) किंमत अनेक घटकांवर अवलंबून आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आणि प्रकल्पाचे स्थान याचा यात समावेश आहे. लक्षद्वीप येथील सहा LTTD प्लांटची एकूण किंमत 187.75 कोटी रुपये इतकी आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयानं राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान या आपल्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे पिण्यायोग्य गोड्या पाण्यात रुपांतर करण्यासाठी लो प्रेशर थर्मल डीसालायनेशन (LTTD) तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिण्यायोग्य पाण्याचा यशस्वी प्रयोग लक्षद्वीप बेटावर यशस्वीपणे करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्लांट्सच्या यशाच्या आधारावर गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपच्या माध्यमातून अमिनी, अन्द्रोथ, चेटलेट, कादमात, काल्पेनी आणि किलतान या ठिकाणी दिवसाला 1.5 लाख लिटर क्षमतेच्या आणखी 6 LTTD प्लांट्सची स्थापना करण्याचे काम सोपवले आहे. त्यामुळे आता लवकरच समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे रुपांतर गोड्या पाण्यात होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT