Niira-Radia 
देश

नीरा राडिया अडचणीत; ३०० कोटींच्या फसवणूकप्रकरणी पोलिसांचं समन्स

या प्रकरणी तीन आरोपींना अटक

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लॉबिस्ट नीरा राडिया यांना ३०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपी यतीश बहाल, सतीशकुमार नरुला आणि राहुल सिंह यादव यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु असताना त्यामध्ये राडिया यांचं नाव समोर आलं आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर. के. सिंह यांच्या माहितीनुसार, राजीव कुमार नामक व्यक्तीनं नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याची सहकंपनी नयाती हेल्थ केअर अँड रिसर्च एनसीआर प्रा. लि. आणि त्याचे संचालक ज्यामध्ये नीरा राडिया, त्यांची बहिण करुणा मेनन, यतीश बहाल, सतीशकुमार नरुला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, या कंपन्यांचं कार्यालय खानपूर भागात आहे. या कंपन्यांचं नाव आधी OSL हेल्थकेअर असं होतं. गुरुग्राममध्ये एक रुग्णालय बनवण्याचा त्यांचा हेतू होता. या प्रकल्पात तक्रारदाराचे ४९ टक्के शेअर होते तर ५१ टक्के शेअर या कंपन्यांशी संबंधित चर्चित मिश्रा आणि चंदन मिश्रा यांचे होते.

तक्रारीत म्हटल्याप्रमाणं, दोघांमध्ये विम्हास नावाचं रुग्णालय सुरु करण्यासाठी करार झाला होता. तक्रारदाराला हे आश्वासनंही देण्यात आलं होतं की, प्रत्येक महिन्याला त्याची प्रोफेशनल फी म्हणून ३० लाख रुपये दिले जातील. रुग्णालयाच्या निर्मितीदरम्यान OSL हेल्थकेअरच्या लोकांनी पैशांच्या कमतरतेचा हवाला देताना आपले ५१ टक्के शेअर नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ला विकून टाकले. ही कंपनी नयाती हेल्थकेअर अँड रिसर्च प्रा. लि. शी संबंधीत होती. ही डील ९९ कोटी रुपयांमध्ये झाली होती. यानंतर या कंपनीचे लोक सर्व निर्णय स्वतःचा घ्यायला लागले तसेच रुग्णालयाच्या निर्मितीसाठी येस बँकेकडून ३१२ कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं. परंतू या पैशांचा वापर रुग्णालयाच्या निर्मितीसाठी केला गेला नाही.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तक्रारदाराची प्रोफेशनल फी १५ कोटी २८ लाख रुपये होती ती देखील त्याला देण्यात आली नाही. तसेच त्याचे शेअर ४९ टक्क्यांवरुन थेट ६ टक्के करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन त्याची चौकशी केली. यामध्ये दिसून आलं की, नारायणी इन्व्हेस्टमेंट प्रा. लि., नयाती हेल्थकेअर अँड रिसर्चची होल्डिंग कंपनी असून त्याची ९३ टक्के शेअर याचेच आहेत. या कंपनीची मुख्य प्रमोटर नीरा राडिया असल्याचं पुढे आलं आहे. या कंपनीने ३१२ कोटींचं कर्ज घेतल्यानंतर त्यातील २०८ कोटी रुपये अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनीच्या खात्यात वर्ग केले.

हे खातं राहुल सिंह यादव नावाच्या व्यक्तीनं हे पैसे हडप करण्यासाठी खोललं होतं. चौकशीत ही माहिती देखील समोर आली आहे की, यतीश वहाल आणि एस. के. नरुला, अहलुवालिया कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधीत होते. पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी केलेल्या छापेमारीनंतर तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच नीरा राडिया आणि त्याची बहिण करुणा मेनन यांना चौकशीसाठी बोलावलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

अखेर तेजश्रीने करून दाखवलंच! 'वीण दोघातली...'ची टॉप ५ मध्ये एंट्री; स्टार प्रवाहच्या या मालिकांचा TRP घसरला, कोण कितव्या स्थानी?

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

SCROLL FOR NEXT