Nirbhaya Case 4 convicts 1 week to resort to all legal remedies availabl 
देश

निर्भया बलात्कार प्रकरण : अखेर तो निर्णय झालाच!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने आज (ता. ५) महत्त्वाचा निर्णय दिला. चारही दोषींना एकाच दिवशी फाशी होईल तसेच चारही जाणांना कायदेशीर पर्यायांचा वापर करण्यासाठी फक्त एका आठवड्याचा आवधी देण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत करत निर्भयाच्या आईन आशादेवी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार २२ जानेवारीला या चौघांना फाशी देण्यात येणार होती. मात्र, त्यांनी टप्प्याटप्प्याने दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे दाखल केला. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल केली. यामुळे त्यांच्या फाशीवर स्थगिती येऊन ती पुढे ढकलली गेली. यानंतर २ फेब्रुवारीला पुन्हा एकदा त्यांची फाशी ठरली मात्र त्याआधी पुन्हा एकदा एका दोषीने माफीचा अर्ज दाखल केल्याने त्या फाशीला स्थगिती मिळाली. आज उच्च न्यायालयाने या सगळ्या बाबी अभ्यासून दोषींना एका आठवड्याचा कालावधी दिला आहे. या एका आठवड्यात त्यांनी उर्वरित कायदेशीर पर्यायांचा अवलंब करायचा आहे. त्यानंतर एक तारीख निश्चित होऊन चौघांना फाशी दिली जाईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले आहे. 

१६ डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीच्या वसंत विहार भागात तरूणीवर पाशवी बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अतिशय वाईट परिस्थितीत तिने झुंज दिली व तिचा मृत्यू झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT