देश

सीतारामन यांनी घेतली मनमोहनसिंग यांची भेट; चर्चांना उधाण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला, तरी यात अर्थसंकल्पावर चर्चा झाल्याचे मानले जाते. यामुळे सोशल मिडीयावर मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे

भाजप आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प पाच जुलैला मांडला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडून कृषी, उद्योग यांसह वेगवेगळ्या क्षेत्रांच्या असलेल्या अपेक्षा अर्थमंत्री जाणून घेत आहेत. गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीदरम्यान राज्यांकडूनही अभिप्राय जाणून घेऊन केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, राज्यांना मिळणारा निधी यांसारख्या बाबींवर त्यांनी विचारविनिमय केला होता.

निती आयोगाने बोलावेल्या अर्थतज्ज्ञांच्या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आर्थिक सूचना जाणून घेतल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी आर्थिक उदारीकरण धोरणाचे शिल्पकार असलेले डॉ. मनमोहनसिंग यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : कोकणसह मुंबई, पुण्यात अतिमुसळधार! ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट; मराठवाड्यातही जोरदार पावसाचा इशारा

'थ्री इडियट'मध्ये प्रोफेसरचं काम केलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा कहर, पुढील १० तास धोक्याचे; लोकल सेवा विस्कळीत, विमान उड्डाणांवर परिणाम, शाळा- महाविद्यालयांना सुट्टी

Satara Monsoon Update:'सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस'; पुढील चार दिवस यलो अलर्ट, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

Nanded Flood: तीनशे जणांना वाचविले; मुखेड तालुक्यातील चार गावांना पुराचा वेढा, बचाव कार्य सुरूच, सत्तर जनावरे गेली वाहून

SCROLL FOR NEXT