nita ambani 
देश

नीता अंबानी BHU च्या प्रोफसर? विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रिलायन्सनं दिलं स्पष्टीकरण

सकाळवृत्तसेवा

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी प्रमुख आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना बनानस हिंदू युनिव्हर्सिटी (BHU) मध्ये व्हिजिटींग प्रोफेसर बनवल्याची माहिती खोटी असल्याची निर्वाळा त्यांच्या प्रवक्त्यांनी दिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी बुधवारी म्हटलं की, नीता अंबानी यांना BHU च्या वतीने व्हिजिटींग प्रोफेसर बनवण्याचा कसलाही प्रस्ताव मिळाला नाहीये.  

अलिकडेच अशी बातमी आली होती की, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या सामाजिक विज्ञान विभागाकडून नीता अंबानींना व्हिजिटींग प्रोफेसर बनवण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई युनिव्हर्सिटीमधून बी.कॉम. केलं आहे आणि त्यांना 2014 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचं कार्यकारी प्रमुख बनवण्यात आलं आहे. असं म्हटलं जात होतं की, त्यांची एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून प्रतिमा असल्याने हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. 

विद्यार्थी करत होते विरोध
नीता अंबानी यांना BHU चे व्हिजीटींग प्रोफेसर बनवले जाण्याच्या बातमीनंतर युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी विरोध सुरु केला होता. विद्यार्थ्यांनी असा आरोप केला होता की, BHU ला उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालवलं जात आहे. याबाबत त्यांनी कारवाईची देखील मागणी केली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हस्तांदोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : भारतात प्रवेश करणाऱ्या 79 कैद्यांना अटक

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT