NITI Aayog 4th Health Index 
देश

आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट

सकाळ डिजिटल टीम

NITI Aayog 4th Health Index : कोरोनामुळे (Corona) मागच्या वर्षात आपल्या आरोग्य व्यवस्थेला बराच ताण सहन करावा लागला आहे, या काळात देशभरातील ढासळलेली आरोग्य सेवा आपण सर्वांनी पाहिली आहे. या दरम्यान, NITI आयोगाने देशातील राज्यांची यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये एकूणच आरोग्य सेवा चांगल्या आहेत (Health Performance) आणि ज्या राज्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे त्यांची रँक जाहीर केली आहे.

NITI आयोगाने सोमवारी आरोग्य निर्देशांक जारी केला. यामध्ये दक्षिणेकडील राज्यांनी बाजी मारली आहे, तर उत्तरेकडील राज्यांची अवस्था बिकट आहे. NITI आयोगाच्या आरोग्य निर्देशांकानुसार (NITI Aayog 4th Health Index) एकूण आरोग्य सेवा कामगिरीच्या बाबतीत केरळ पुन्हा एकदा राज्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, उत्तर प्रदेशमध्ये परिस्थिती ही सर्वात वाईट आहे.

तामिळनाडू आणि तेलंगणा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मिझोराम लहान राज्यांमध्ये आरोग्य सेवा कामगिरीमध्ये (Health Performance) अव्वल राहिले आहे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये, दिल्ली व जम्मू आणि काश्मीर एकूण कामगिरीच्या बाबतीत आतापर्यंत तळाशी होते, परंतु परिस्थिती सुधारण्याच्या बाबतीत दोन्ही राज्ये आघाडीवर पोहोचली आहेत. त्याचप्रमाणे, 2018-19 च्या तुलनेत 2019-20 मध्ये परिस्थिती सुधारण्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल असल्याचे अहवालात म्हटले आहे.

या यादीत उत्तर प्रदेश 19व्या तर बिहार 18व्या क्रमांकावर आहे. चांगली आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या बाबतीत, मिझोराम लहान राज्यांमध्ये प्रथम, तर त्रिपुरा आणि नागालँड दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, केंद्रशाषि प्रदेशांमध्ये दादरा नगर हवेली पहिल्या क्रमांकावर आणि चंदीगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर दिल्ली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT