CM Mamata Banerjee 
देश

NITI Aayog meeting: 'मी बोलत असताना माईक बंद केला'; निती आयोगाच्या बैठकीनंतर ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप

NITI Aayog meeting in Delhi, CM Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील बैठकीला उपस्थित होत्या. पण, त्यांना बोलू दिलं नसल्याचा दावा ममतांनी केला आहे. एएनआयशी त्या बोलत होत्या.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीमध्ये आज निती आयोगाची बैठक सुरू आहे. बैठकीला अनेक राज्यांचे मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील बैठकीला उपस्थित होत्या. पण, त्यांना बोलू दिलं नसल्याचा दावा ममतांनी केला आहे. 'एएनआय'शी त्या बोलत होत्या.

ममता बॅनर्जी म्हणाल्यात की, मी बोलत होते, पण, माईक बंद करण्यात आला. मी विचारलं तुम्ही माईक का बंद केलं? तुम्ही भेदभाव का करत आहात? मी बैठकीला उपस्थिती लावत आहे त्यामुळे तुम्ही खूष असायला हवं. पण, तुम्ही सरकारमधील पक्षांना जास्त संधी देत आहात. मी विरोधकांच्या बाजूने या ठिकाणी आहे. पण, तुम्ही बोलायला देत नाही. हा केवळ पश्चिम बंगालचा अपमान नाही, तर संपूर्ण स्थानिक पक्षांचा अपमान आहे, असं ममता म्हणाल्या आहेत.

मी बैठकीत म्हटलं की, केंद्र सरकारने राज्यांसोबत भेदभाव करायला नको. मला बोलायचं होतं, पण मला फक्त ५ मिनिटे बोलण्यास देण्यात आलं. त्यानंतर माझा माईक बंद करण्यात आला. माझ्या आधीच्या नेत्यांना १० ते २० मिनिट बोलायला देण्यात आलं. विरोधी पक्षाकडून कोणीही बैठकीत नव्हतं. मी एकटी होते. पण, तरी त्यांनी मला बोलायची संधी दिली नाही. हे अपमानजनक आहे, असं देखील ममता म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी या निती आयोगाची बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्या आहेत. आपल्याला बैठकीत बोलू दिलं जात नसल्याचा त्यांनी दावा केला आहे. याआधीच सात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. असे असताना ममता यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. पण, त्याही आता बैठकीतून बाहेर पडल्या आहेत.

केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आंध्र प्रदेश आणि बिहारला झुकते माप देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळेच विरोधकांनी या बैठकीला उपस्थिती लावण्यास नकार दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीसाठी काल रात्रीच दिल्लीत दाखल झाले आहे. विरोधकांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ते राज्याच्या पदरात काही पाडून घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

SCROLL FOR NEXT