Nitin Gadkari Nitin Gadkari
देश

इलेक्ट्रिक गाड्या पेट घेण्याच्या घटनांनंतर नितीन गडकरींचा मोठा निर्णय

नितीन गडकरी यांनी ट्विट करत अशा दुर्घटनांबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

हैद्राबादमध्ये इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी घरामध्ये चार्ज करत असताना पेट घेतल्याने नुकतंच एका ८० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले. या आधीही देशभरात अनेक ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या होत्या. ओला, ओकिनावा आणि जितेंद्र या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींना(Electric Vehicles) आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक दुचाकींनी पेट घेण्याच्या प्रकारात ज्या कंपन्या निष्काळजीपणा करताना आढळतील, त्यांना दंड ठोठावण्यात येईल.त्या आधीच इलेक्ट्रिक गाड्या तयार करणाऱ्या कंपन्यांनी सर्व सदोष गाड्या मागे घ्याव्यात असंही गडकरी यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी तज्ज्ञांची एक समिती गठीत करण्यात आली असून त्याद्वारे चौकशी होणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

पुण्यातमध्ये ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतल्याची घटना घडल्यानंतर सरकारने कारवाई केली होती. तसंच या कंपनीला अपघात कसा झाला आणि तो रोखण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या नियमावलीनुसार कोणते उपाय करता येतील याबद्दलची माहिती देण्यास सांगितलं होतं. इलेक्ट्रिक गाड्यांच्या गुणवत्तेसाठीची नियमावलीही सरकार लवकरच जारी करणार असल्याचे संकेत गडकरी यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha: आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक का हरली? धक्कादायक खुलासा करत राघव चड्ढांनी आतली गोष्ट सांगितली; सर्वात मोठं गुपित फोडलं

DC vs PBKS चालू सामन्यात दुर्घटना! लुंगी एनगिडीचं कॅच घेताना डोकं आपटलं; अँब्युलन्सलाच मैदानात यावं लागलं

Israel Operation: भारताच्या 'या' राज्यात सुरु आहे इस्रायलचं गुप्त ऑपरेशन; बनी मेनाशे समुदायाबाबत महत्त्वाची माहिती

PSL: दळभद्री पाकिस्तानी! पांढरा चेंडू सांगून लाल चेंडूने खेळवतात; PSL मध्ये लाजीरवाणा प्रकार

Chanakya Life Guide : 'या' 3 कारणांमुळे लोक तुम्हाला महत्व देणं बंद करतात; बोलणंही टाळू लागतात, आत्ताच पाहा तुमचं नेमकं कुठे चुकतंय

SCROLL FOR NEXT