Emergency Landing of Nitin Gadkari’s Aircraft in Bihar : भारतात मागील काही दिवसांपासून सातत्याने विमानसेवेशी निगडीत विविध घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच अहमदाबादेत घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर अनेक विमानांचे मार्ग बदलले गेले तर काही विमान फेऱ्या रद्द केल्या गेल्या. तसेच, अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्याही घटना समोर आल्या आहेत.
आता आज(गुरुवारी) देखील खराब हवामानामुळे बिहारमधील गया विमानतळावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. गडकरी आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी रांचीला निघाले होते. मात्र अचानक हवामान बिघडल्याने व मुसळधार पावासाला सुरुवात झाल्याने दृश्यमानता अतिशय कमी झाली, अखेर गडकरी ज्या विमानात बसले होते ते विमान दक्षतेचा उपाय म्हणून पुन्हा वळवून गया विमानतळावर उतरवण्यात आले.
गया विमानतळ प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ प्रशासनास गडकरींचे विमान माघारी वळवण्याची माहिती ३० मिनिटे आधीच मिळाली होती. त्यानंतर गया विमानतळचे सर्व अधिकारी व सुरक्षा कर्मचारी सतर्क झाले होते. विमानतळावरील सुरक्षाही वाढवली गेली होती.
विमानतळ परिसरातील व्हीआयपी प्रतीक्षालयात गडकरींच्या विश्रांतीची व्यवस्था केली गेली. काही वेळ वाट पाहून वातावरण ठीक झाल्यावर रांचीहून एक विशेष विमान बोलावले गेले आणि मग गडकरी रांचीला रवाना झाले.या घटनेबाबत गडकरींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. केवळ गया विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या फोटोत विमानतळ परिसरात गडकरी दिसत आहे.
सध्या मान्सूनमुळे झारखंड आणि बिहारच्या अनेक भागात तुफान पाऊस सुरू आहे, त्यामुळे विमानसेवेत अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान केंद्रीयमंत्र्यांचे विमान अचानक उतरल्याची माहिती मिळताच गया विमानतळावरही मोठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.