Nitin Gadkari 
देश

लसीबद्दल सरकारच्या प्रयत्नांची माहिती नव्हती - गडकरी

सूरज यादव

नवी दिल्ली - देशातील कोरोना (Corona) लशीच्या उत्पादनाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत आता केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलं आहे. गडकरी यांनी मंगळवारी असा सल्ला दिला होता की, कोरोना प्रतिबंधक लशीचं (Covid 19 Vaccine) उत्पादन वाढवण्यासाठी आणखी काही कंपन्यांना याच्या उत्पादनासाठी मंजुरी द्यायला हवी. आता यावर खुलासा करताना गडकरी म्हणाले की, काल झालेल्या स्वदेशी जागरण मंचाकडून आयोजित कार्यक्रमात भाग घेताना मी लशीच्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी सल्ला दिला होता. मी याबाबत अनभिज्ञ होतो की, माझ्या भाषणाच्या आधी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबाबत सांगितलं होतं. (nitin gadkari say i was unaware about government efforts for vaccine)

कार्यक्रम संपल्यानतंर मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, भारत सरकारने आधीपासूनच 12 वेगवेगळ्या कंपन्यांना लस निर्मितीसाठी सुविधा प्रदान केली आहे. या प्रयत्नामुळे भविष्यात लसीचे उत्पादन वेगाने वाढण्याची शक्यता आहे. गडकरी म्हणाले की, मला याबाबत माहिती नव्हतं की, मी सल्ला देण्याआधीच सरकारने प्रयत्न सुरु केले होते. मी आनंदी आहे आणि या दिशेनं योग्य वेळेत प्रयत्न केल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. मी याची नोंद ठेवणं खूप महत्त्वाचं समजतो.

काय म्हणाले होते गडकरी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) याबाबत विनंती करणार आहे की देशात जीवरक्षक औषधांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणखी काही औषध कंपन्यांना मंजुरी द्यावी. यासाठी कायदा तयार करण्यात यावा. या औषधांमध्ये पेटंट असलेल्या इतर कंपन्यांकडून दहा टक्के रॉयल्टीची व्यवस्थाही करण्यात यायला हवी असं गडकरी म्हणाले होते.

लसीच्या पुरवठ्याच्या तुलनेत त्याची मागणी वाढली तर मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे एका कंपनीऐवजी 10 कंपन्यांना लशीचं उत्पादन करण्यासाठी परवानगी द्यायला हवं. यासाठी लसीचं मूळ पेटंट असलेल्या कंपनीला इतर कंपन्यांकडून दहा टक्के रॉयल्टी द्यायला हवी असंही गडकरी म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT