Nitin Gadkari  sakal
देश

Nitin Gadkari : दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरुन गडकरींना धमकी; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

रोहित कणसे

भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेळगाव तुरुंगात बंद असलेला दहशतवादी संघटनेचा सदस्य अकबर पाशा याच्या सांगण्यावरूनच जयेश कांथा उर्फ शाकीरनं गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस चौकशी करणार आहेत.

अकबर पाशा हा प्रतिबंधित पीएफआय संघटनेचा सदस्य असून नागपूर पोलीस बेळगाव कारागृहात बंद असलेल्या अकबर पाशा सह त्याच्या इतर दहशतवादी साथीदारांची चौकशी करणार आहेत.

दरम्यान जयेश उर्फ शाकीर हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांशी संपर्कात असल्याचे पुरावे तपासात मिळाले असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

बेळगावच्या तुरुंगातून १४ जानेवारी आणि २१ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारीने फोन करत धमकी दिली होती. यावेळी पहिल्यांदा १०० कोटी तर दुसऱ्या वेळी १० कोटी रुपये खंडणी म्हणून मागण्यात आले. पैसे न दिल्यास गडकरींन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

Nagpur: ४२ वर्षीय डॉक्टरनं भुलीचं इंजेक्शन टोचून घेत आयुष्य संपवलं, ५ दिवसांपासून गेले नव्हते घरी

Latest Marathi News Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २६ जूनपर्यंत येलो अलर्ट; ३० जूनपर्यंत पडणार दमदार पाऊस

India vs SA World Cup: सुटलेल्या झेलांचा फटका : हरमनप्रीत कौर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधाराची निराशा

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

SCROLL FOR NEXT