Nitish Kumar Politics News
Nitish Kumar Politics News  
देश

Nitish Kumar : भाजपसोबत हातमिळवणी करणाऱ्या नितीश कुमारांविरोधात RJDचा प्लॅन काय?

रोहित कणसे

Nitish Kumar Politics News : बिहारमध्ये आज (२८ जानेवारी) रोजी एनडीए सरकार स्थापन होणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला असून एनडीए मध्ये सामील होत भाजपच्या मदतीने नितीश कुमार पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर बसणार आहेत.

मात्र यादरम्यान राष्ट्रीय जनता दलाकडून नितीश कुमार यांना रोखण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात झाली आहे. राजनितीचा भक्कम अनुभव पाठिशी असलेले राजद सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांची आक्रमकता नितीश कुमार यांना पाहायला मिळू शकते. जदयू आणि भाजप सरकार स्थापनेत गुंतलेले असताना दुसरीकडे राजद कडून जनतेपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.

राजदकडून आजच वर्तमानपत्रांमध्ये महाआघाडी सरकारकडून मागील दीड वर्षात करण्यात आलेल्या कामांची माहिती देणाऱ्या जाहीराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये तेजस्वी यादव आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांवर दावा सांगत आहेत. राजदकडून देण्यात आलेल्या या जाहीरातीमध्ये महाआघाडी सरकारने केलेल्या कामाचं श्रेय तेजस्वी यादव यांना असल्याचे सांगण्यात आले आहे.

जातीच्या आधारावर झालेली जनगनना, आरक्षणाच्या कोट्यात झालेली वाढ तसेच चार लाखांहूनन अधिक शिक्षकांना नोकरी देणे यासारखी कामे तेजस्वी यादव यांनी केलेली कामे असल्याचे राजदने म्हटले आहे.

नितीश कुमार यांच्या १६ वर्षांच्या सरकारमध्ये जितके नोकऱ्या देण्यात आल्यात्यापेक्षा अधिक कायमस्वरुपी सरकारी नोकऱ्या १८ महिन्यांत तेजस्वी यादव यांच्या प्रभावाखालील महाआघाडी सरकारने दिल्या असा प्रचार आता आरजेडीने सुरू केला आहे. आरजेडी पक्ष एवढ्यावरच थांबला नाहीये तर जात सर्वेक्षण, ७५ टक्के आरक्षण, शिक्षकांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा, जीविका दीदी, पंचायत प्रतिनिधी, टोला सेवक, मरकज आदींच्या मानधनात वाढ, पूल आणि रस्ते बांधणीचे श्रेय घेतले आहे.

तेजस्वी यादव यांच्याकडून आधीच श्रेय घेण्याचे प्रयत्न केले जात होते. यापूर्वी देखील यासाठी पोस्टर्सचाही अनेकदा वापर करण्यात आला. तेजस्वी यादव यांचे ध्येय २०२५ च्या विधानसभा निवडणुकीवर आहे. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

नितीश कुमार यांच्या अडचणी वाढणार?

राजदचे राजकारण इथेच संपलेले नाही. आरजेडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश सरकारला पराभूत करण्यासाठी सभागृहातही तयारी सुरू आहे. सभागृहाच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणून सरकार पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.

राजदच्या संपर्कात असलेल्या जेडीयूच्या आमदारांना अविश्वास ठरावावेळी गैरहजर ठरवून सरकार पाडण्यासाठी आवश्यक जादूई आकडा गाठण्यासाठीचे डावपेच आखले जात असल्याचे बोलले जात आहे. तसेच हमच्या चार आमदारांना महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्रीपदाचे आमिष दाखवले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT