Nitish Kumar and Modi election
देश

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

KC Tyagi's letter to PM Modi: जाणून घ्या, केसी त्यागी यांनी पंतप्रधान मोदींना पाठलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलय?

Mayur Ratnaparkhe

JDU Demands Bharat Ratna for Nitish Kumar :नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीश कुमार यांचे नाव सर्वात जास्त काळ सेवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये समाविष्ट झाले आहे. दरम्यान आता नितीश कुमार यांचा पक्ष असलेल्या जेडीयूचे ज्येष्ठ नेते केसी त्यागी यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार यांना भारतरत्न दिला जावा, अशी मागणी केली आहे. 

एवढच नाहीतर तर  त्यागी यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिकपणे पत्र देखील पाठवले आहे. पत्रात त्यागी लिहितात की नितीश कुमार हे या पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र आहेत, जसे गेल्या वर्षी चौधरी चरण सिंह आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला होता.

एका न्यूज चॅनलची बोलताना केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांच्या बिहार आणि देशासाठीच्या सेवांचा सन्मान करण्यासाठी यापेक्षा चांगले पाऊल असू शकत नाही. खरंतर जिवंत व्यक्तीला भारतरत्न प्रदान करणे दुर्मिळ आहे. मात्र याबाबत त्यागी म्हणाले की, सुमारे सहा जणांना जिवंतपणी भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, लता मंगेशकर आणि प्रणव मुखर्जी सारख्या व्यक्तींचा समावेश आहे.

पंतप्रधान सामान्यतः जानेवारीमध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी भारतरत्न पुरस्काराची घोषणा करतात. गेल्या वर्षी शेतकरी नेते चौधरी चरण सिंह आणि महान समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला तेव्हा कर्पूरी ठाकूर यांना देण्यात आलेला भारतरत्न पुरस्कार बिहार निवडणुकीशी जोडला गेला कारण ठाकूर अत्यंत मागास जातीचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT