nitish kumar esakal
देश

Nitish Kumar : नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाची यादी आली समोर; आज शपथ घेणाऱ्यांमध्ये 'यांचा' समावेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमारांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं. आता सायंकाळी पाच वाजता भाजपसोबत जात ते पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

संतोष कानडे

Nitish Kumar with NDA : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमारांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं. आता सायंकाळी पाच वाजता भाजपसोबत जात ते पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

विशेष म्हणजे दोन भाजप नेते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांनी रविवारी सकाळी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे जेडीयू आणि आरजेडीचं सरकार कोसळलं आहे. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी नवीन सरकार स्थापनेचा दावा स्वीकारला असून बिहारमध्ये आता एनडीएचं सरकार स्थापन होत आहे.

भाजपने विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचं निश्चित केलं आहे. शिवाय रविवारी सायंकाळी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आलेली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

आज शपथ घेणारे मंत्री

  1. सम्राट चौधरी (भाजप)

  2. विजय कुमार सिन्हा (भाजप)

  3. डॉ. प्रेम कुमार (भाजप)

  4. विजय कुमार चौधरी (जेडीयू)

  5. बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)

  6. श्रावण कुमार (जेडीयू)

  7. संतोष कुमार सुमन (HAM)

  8. सुमित कुमार सिंग (अपक्ष)

नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे. नव्या सरकारला जीतनराम मांझी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडे चार आमदार आहेत. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डी हे पाटण्याला रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT