Nitish Kumar swearing in ceremony esakal
देश

Nitish Kumar Takes Oath : नितीश कुमारांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ; 'या' नेत्यांना मिळालं कॅबिनेट मंत्रिपद

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा देऊन विद्यमान सरकार विसर्जित केलं होतं.

संतोष कानडे

पाटणाः बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा शपथ घेतली आहे. २४ वर्षांमध्ये नवव्यांदा शपथ घेणारे ते एकमेव नेते ठरले आहेत. रविवारी सकाळी त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा देऊन विद्यमान सरकार विसर्जित केलं होतं.

भाजपने विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांच्यावर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्याचं निश्चित केलं होतं. त्यानुसार या दोन्ही नेत्यांनी नितीश कुमार यांच्यानंतर शपथ घेतली आहे.

या आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

  1. सम्राट चौधरी (भाजप)

  2. विजय कुमार सिन्हा (भाजप)

  3. डॉ. प्रेम कुमार (भाजप)

  4. विजय कुमार चौधरी (जेडीयू)

  5. बिजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू)

  6. श्रावण कुमार (जेडीयू)

  7. संतोष कुमार सुमन (HAM)

  8. सुमित कुमार सिंग (अपक्ष)

नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पद दिलं आहे. नव्या सरकारला जीतनराम मांझी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडे चार आमदार आहेत.

सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली

आरजेडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश सरकारला पराभूत करण्यासाठी सभागृहातही तयारी सुरू आहे. सभागृहाच्या अधिवेशनात अविश्वास प्रस्ताव आणून सरकार पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. राजदच्या संपर्कात असलेल्या जेडीयूच्या आमदारांना अविश्वास ठरावावेळी गैरहजर ठरवून सरकार पाडण्यासाठी आवश्यक जादूई आकडा गाठण्यासाठीचे डावपेच आखले जात असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT