Nitish Kumar esakal
देश

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय भूकंप; CM नितीश कुमार यांचा अखेर राजीनामा

जदयू आणि भाजप युती तुटली, नव सरकार स्थापन्याच्या हालचाली वाढल्या

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. याद्वारे त्यांनी भाजपची साथ सोडल्यावर शिक्कामोर्तब झालंय. यानंतर आता ते राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली करत आहेत. (Nitish Kumar confirms that he has resigned as Bihar CM)

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार हे राजदच्या नेत्या माजी मुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले आहेत. याठिकाणी बैठकीनंतर राजदसोबत नवं सरकार स्थापण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

आमदार, खासदारांच्या चर्चेनंतर दिला राजीनामा - नितीशकुमार

राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना नितीश कुमार म्हणाले, "आपण एनडीए सोडायला हवी यावर जनता दलाच्या (युनायटेड) सर्व खासदार आणि आमदारांचं एकमत झालं. त्यानंतर लगेचच मी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

Ausa News : अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या शिक्षिकेवरही गुन्हा दाखल करा; आरपीआय आठवले गटाची मागणी

Modi Cabinet Reshuffle : मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? महाराष्ट्राला मिळू शकते नवे मंत्रिपद; 'या' मंत्र्यांना डच्चू?

Operation All Out: ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका : 12 तासांत 104 गुन्हे, 129 आरोपींवर कारवाई; 75.36 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT