Nitish Kumar presents mangoes to Prime Minister narendra modi on victory lok sabha election 2024 Sakal
देश

नितीशकुमारांकडून पंतप्रधानांना विजयानिमित्त आंब्यांची भेट; भागलपूरचे प्रसिद्ध जर्दाळू आंबे दिल्लीला

पंतप्रधान आणि राष्ट्रपती २००७ पासून जर्दाळू आंब्यांचा आस्वाद घेत आहेत. पण यावेळी ही भेट खास आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यपाल, मंत्री आणि काही खास व्यक्तींना भागलपूरचे प्रसिद्ध जर्दाळू आंबे भेट म्हणून पाठविले आहेत.

भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळालेल्या या आंब्यांना देशात आणि विदेशातही खूप मागणी असते. नितीशकुमार यांच्याकडून भागलपूरमधून दरवर्षी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह नामांकित व्यक्तींना हे आंबे भेट दिले जातात. पंतप्रधान आणि राष्ट्रपती २००७ पासून जर्दाळू आंब्यांचा आस्वाद घेत आहेत. पण यावेळी ही भेट खास आहे.

कारण निवडणुकीतील विजयाची भेट म्हणून एखाद्या पंतप्रधानांना हे आंबे पाठविण्यात आले आहेत. केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’ सरकार स्थापन होत असताना नितीशकुमार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याकाळात पंतप्रधानांना दिलेली ही भेट खास मानली जात आहे. यातून विजयाचा आनंद साजरा करण्याचा आणि सलोख्याचे संबंध कायम ठेवण्याची नितीशकुमार यांची भावना व्यक्त होत आहे.

‘मँगो मॅन’च्या बागेतून टेबलावर

जर्दाळू आंबे हे बिहारच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. चव आणि गुणवत्तेसाठी ते प्रसिद्घ असून खास प्रसंगी ते भेट देण्याची परंपरा बिहारमध्ये आहे. भागलपूर जिल्ह्यातील सुलतानगंजमधील शेतकरी अशोक चौधरी हे ‘मँगो मॅन’ नावाने प्रसिद्ध आहेत.

कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आमराईतून आंब्यांची पाहणी करून पेट्या तयार केल्या आहेत. विक्रमशीला एक्स्प्रेसमधून दोन हजार आंबे पाठविण्यात आले आहेत. आनंदविहार टर्मिनलमधून आंबे उद्या (ता.६) बिहार भवनमध्ये उतरविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांचे वाटप करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Kolhapur : 'गोकुळ' निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का? माजी अध्यक्ष डोंगळे यांचा थेट इशारा, म्हणाले 'आमच्याशिवाय पर्याय शोधल्यास...'

Asian Games : भारतीय क्रिकेटपटूच्या घराबाहेर पोहोचली तरुणी; खेळाडू श्रेयससोबत जपानमध्ये, तिचा इथे ड्रामा, नेमकं काय घडलं?

पदरात लहान मुलगी, वयही झालेलं नाही तरीही दुसरं लग्न का करत नाहीये मानसी कुलकर्णी? म्हणते, 'सासरचे मला म्हणतात...

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

SCROLL FOR NEXT