nitish kumar sakal
देश

Nitish Kumar: नीतीश सबके हैं! शरद पवारांचा नीतीश कुमार यांना साद, उपपंतप्रधान पद घेत 'इंडिया'मध्ये येणार का?

INDIA vs NDA: दरम्यान नीतीश कुमार इंडिया आघाडी आल्यास त्यांना उपपंतप्रधान पद देण्याची चर्चा सुरू झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली असून, यामध्ये एनडी आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ असून, काही जागा पडल्यास खासदारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.

दरम्यान बिहारमध्ये 15-17 जागांवर आघाडीवर असलेल्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना शरद पवार यांनी फोन करत इंडिया आघाडीत येण्यासाठी साद घातली आहे. दरम्यान नीतीश कुमार इंडिया आघाडी आल्यास त्यांना उपपंतप्रधान पद देण्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान 543 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए 285 जागांवर पुढे आहे. तर इंडिया आघाडी 235 जागांवर पुढे आहे. जर एनडीएच्या जाग आणखी कमी झाल्या तर एनडीए मधील काही पक्षांना सोबत घेत इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.

दरम्यान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना फोन करत इंडिया आघाडीत येण्याची साद घातली आहे. त्याचबरोबर नीतीश इंडिया आघाडीत आले तर त्यांना उपपंतप्रधान पद मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने दमदार कामगिरी करत महायुतीला जेरीस आणले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आपली ताकद पणाला लावत 30 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर महायुती 17 जागांवर आघाडीवर आहे.

महाराष्ट्रातील या कलांवरून हे लक्षात येते की, जनतेला फोडाफोडीचे राजकारण पटलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT