अजय मिश्रा sakal
देश

कारवाई नाही, पण स्वत:हून राजीनामा

अजय मिश्रा प्रकरणी भाजपचा मध्यम मार्ग

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी प्रकरणी आरोपांच्या फैरीत सापडलेले, पत्रकारांना शिवीगाळ-धक्काबुक्की करणारे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्याबाबतीत सध्याचा गदारोळ थोडा थांबला की मिश्रा यांनी स्वतःहूनच राजीनामा द्यावा, असा मध्यम मार्ग चोखाळावा, या विचाराप्रत भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व आल्याची निश्चित माहिती ‘सकाळ’ला मिळाली आहे.

मंत्री मिश्रा यांच्यावर कारवाई तातडीने होण्याची शक्यता भाजप नेते अजूनही फेटाळतात. मात्र मिश्रा यांनी पत्रकारांना शिवीगाळ केल्याने गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना काल (ता. १५) चांगलेच फटकारले. तरीही, विरोधकांचा संसदेतील गदारोळ सुरू असेपर्यंत मिश्रांवर कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता नाही, असेही पक्षनेते सांगतात.

काही वर्षांपूर्वी माजी खासदार कार्ती चिदंबरम यांच्यावर आरोप होताच त्यांचे वडील आणि तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर राज्यसभेत कडकडीत बहिष्कार घालणाऱ्या भाजपने मिश्रा यांच्या मुद्यावर मात्र - ‘मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा पित्याला का द्यायची,’ अशी कोलांटउडी मारली आहे. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात गुन्हेगारी इतिहास असलेल्या बाबूसिंह कुशवाहा यांना भाजपने वाजत गाजत पक्षात घेतल्यावर गदारोळ झाला होता आणि संघाने मध्यस्थी करून कुशवाहा यांना स्वतःलाच राजीनामा देण्यास सांगितले होते, असे पक्षनेते सांगतात.

मागच्या दाराने मंत्रालयात !

अजय मिश्रा आज गृह मंत्रालयात मागील दरवाजाने आले आणि मागील दरवाजानेच बाहेर पडले. तेथेही पत्रकारांना पाहताच थेट दरवाजातच त्यांची गाडी लावण्यात आली व तीत बसून, खाली मान घालून, मोबाईल पाहण्याचे निमित्त करून मिश्रा निघून गेले. त्यांच्याकडील महत्त्वाच्या फायली आधीच काढून घेण्यात आलेल्या असून चार दिवस त्यांना ईशान्य भारताच्या दौऱ्यावर जाण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी (ता. २०) सशस्त्र सीमा बलाच्या वर्धापनदिन सोहळ्याला मिश्रा हे प्रमुख पाहुणे आहेत. मात्र, त्या कार्यक्रमालाही न जाण्यास त्यांना सांगितले जाण्याची शक्यता आहे.

मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला दोषी ठरविणारा अहवाल देणारी एसआयटी योगी सरकारनेच बनविली ना? न्यायालयाच्या आदेशानंतर मिश्रा प्रकरणी कायदा आपले काम करत असताना, ‘मंत्री मारेकरी आहे’ असे सांगणारे स्वतःला कायद्याच्या वर मानतात. अध्यादेश फाडण्याचा त्यांचाच इतिहास आहे.

- मुख्तार अब्बास नक्वी, भाजप नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital India : विसरून जा पैशाचं पाकीट अन् कागदपत्रे! प्रजासत्ताक दिनला पाहा भारताचे 4 'डिजिटल ब्रह्मास्त्र', ज्यांनी देशाला बदलून टाकलंय

बापरे! मराठमोळ्या रिलस्टारचं निधन, प्रथमेश कदमच्या जाण्याने सगळ्यांनाच बसला धक्का, आई-मुलाची होती सुपरहिट जोडी

Yuvraj Singh : ''पण तू १२ चेंडू फिफ्टी मारू शकत नाहीये''; अभिषेक शर्माबाबत युवराज सिंगची पोस्ट व्हायरल!

Republic Day 2026: संपूर्ण देशाचं लक्ष वेधणारा फोटो! 77व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींचा खास लूक चर्चेत

Latest Marathi news Update : परेडमध्ये टी-९० भीष्म आणि अर्जुन रणगाडयांची गर्जना,नौदलाच्या संचलनात आयएनएस विक्रांतचा समावेश

SCROLL FOR NEXT