No entry if there no vaccination sakal
देश

प्रजासत्ताक दिनी राजपथावर लसीकरण नसल्यास ‘नो एंट्री’

राजपथ संचलन पाहणाऱ्यांसाठी पोलिसांचे निर्देश; लहान मुलांना प्रवेश नाही

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर प्रवेश मिळवायचा असेल, तर कोविड-१९ लसीकरणाचे दोन्ही टप्प्यांचे लसीकरण होणे अत्यावश्यक आहे. दिल्ली पोलिसांनी आज जारी केलेल्या सुधारित दिशानिर्देशांनुसार दोन्ही टप्प्यांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र नसेल तर २६ जानेवारीला राजपथावर प्रवेशच मिळणार नाही. व्हीव्हीआयपींपासून सामान्य नागरिकांसाठीही लसीकरण प्रमाणपत्र जवळ बाळगण्याचा आग्रह करण्यात आला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू असल्याने यंदाच्या संचलनात १५ वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण संचलनादरम्यान मास्क लावणे व सामाजिक अंतरभानाचे काटेकोर पालन करणेही सक्तीचे करण्यात आले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात ७५ लढाऊ विमानांच्या हवाई कसरतींसह अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा म्हणजे सकाळी साडेदहापासून संचलनास सुरवात होईल. यासाठी हजारो नागरिकांनी पास घेतले आहेत आणि या सर्वांना लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक असेल.

प्रजासत्ताक दिन संचलनासाठी दिल्ली पोलिसांनी यंदा विशेष सुरक्षा उपाययोजना केल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले. यासाठी राजपथच नव्हे तर ल्यूटियन्स दिल्लीच्या व दिल्लीकडे येणाऱ्या सीमांवरही प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. २५ जानेवारीच्या दुपारपासून सरकारी कार्यालये रिकामी करण्यात येतील. राजपथासह दिल्लीच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी दिल्लीतील ७१ पोलिस उपायुक्त (डीसीपी), २१३ सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) व ७५३ पोलिस निरीक्षक, उप निरीक्षक यांच्यावर असेल. त्यांच्या जोडीला फक्त राजपथाच्या आसपास २७ हजार ७२३ पोलिस व केंद्रीय सशस्त्र दलांचे हजारो जवानही हजारो तैनात असतील. स्फोटके व बॉम्ब निकामी करणारी पथकेही ठिकठिकाणी तैनात केली जात आहेत.

दोन महिन्यांपासून सुरक्षेची तयारी

मागील दोन महिन्यांपासून प्रजासत्ताक दिन संचलनाच्या सुरक्षेची तयारी दिल्ली पोलिस दलातर्फे सुरू आहे. केंद्राने १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाला सुरवात केली होती. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या संचलनात १५ वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश मिळणार नाही. संचलन पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी राजपथाकडे येणारी सारी प्रवेशद्वारे सकाळी सातला उघडण्यात येतील. मोटारचालकांना त्यांच्या मोटारीच्या चाव्या वाहनतळावर जमा कराव्या लागतील, असेही या दिशानिर्देशांत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT