maha vikas aaghadi jalgaon 
देश

गोव्यात महाविकास आघाडी नाहीच! राष्ट्रवादी-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमुळं आघाडी होऊ शकली नसल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

पणजी : गोव्यात (Goa) महाराष्ट्राप्रमाणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस (ShivSena NCP Congress) हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन तयार झालेली महाविकास आघाडी (MVA) होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या आघाडीसाठी शिवसेना-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरु होते मात्र काँग्रेसनं सुरुवातीपासूनच दूर राहण्यावर ठाम असल्यानं आज अखेर या तिन्ही पक्षांची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या युतीवर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यासाठी सध्या गोव्यात आहेत. एका बैठकीनंतर त्यांच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. (No Mahavikas Aghadi in Goa NCP ShivSena will fight together)

प्रफुल्ल पटेल म्हणाले, "काँग्रेसचं म्हणणं आहे की, आम्ही आमच्या एकट्याच्या जीवावर गोव्यात निवडणूक जिंकू शकतो. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीशिवाय जर काँग्रेसनं स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली तर ते एकही जागा मिळवू शकणार नाहीत"

दरम्यान, नवाब मलिक यांनी काल म्हटलं होतं की, आम्ही काँग्रेससोबत गोव्यात निवडणूक लढवू इच्छित होतो. पण काही स्थानिक नेत्यांमुळं आमची आघाडी होऊ शकली नाही. १८ जानेवारी रोजी आमचे एक सरचिटणीस आणि एक मंत्री आघाडीसंदर्भात बैठकीसाठी गोव्याला जातील. पण आता राष्ट्रवादीनं ते काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

गोव्यात २०१७ मध्ये कसं होतं पक्षीय बलाबल?

सन २०१७ मध्ये गोव्यात काँग्रेस आणि भाजपनं ३६ जागांवर स्वतंत्ररित्या निवडणूक लढवली होती. यांपैकी काँग्रेसला १७ तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. तर गोवा फॉरवर्डला ४ पैकी ३ जागा मिळाल्या होत्या. तर महाराष्ट्र गोमन्तक पार्टीनं ३४ जागा लढवल्या होत्या यांपैकी त्यांना केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. याशिवाय ३ जागा अपक्ष उमेदवारांना तर एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT