Doctor prescription
Doctor prescription sakal
देश

मेडिकलमध्ये किरकोळ तापावरील औषधांसाठी डॉक्टरांची चिठ्ठीची गरज नाही

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - सर्दी, डोकेदुखी, खोकला, किरकोळ तापावरील औषधांसाठी आता मेडिकल दुकानात प्रिस्ट्किप्शन म्हणजे डॉक्टरांची चिठ्ठी दाखवावी लागणार नाही. केंद्र सरकारने किरकोळ आजारांवरील १६ औषधे ‘ओव्हर द काऊंटर' म्हणजेच ओटीसी गटात ठेवण्याची शिफारस केली आहे. यामुळे पॅरासिटॅमॉलसारख्या गोळ्या औषधांसाठी डॉक्टरांची चिठ्ठी लागणार नाही किंवा ती नसेल तरी ही औषधे द्यावी लागतील. किरकोळ सांधेदुखीसाठीच्या डायक्लोफेनेक सारख्या औषधांचाही यात समावेश आहे.

दरम्यान ज्या औषधांच्या वापरांचा-उपचारांचा कालावधी ५ दिवसांपेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य राहणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओडटीसी तील नियमांंत दुरूस्ती करण्यासाठी १९४५ च्या औषधी अधीनियमात दुरूस्ती करण्यासाठी गॅझेट सूचनावली जारी करण्याची तयारी केली आहे. या औषधांसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची अनिवार्यता संपुष्टात येणार आहे. सर्दी खोकल्यावरील औषधे थेट मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येणे त्यामुळे शक्य होईल. डॉक्टरांची शिफारस नसताना औषधे विकल्या प्रकरणी त्यांच्यावर या बाबतीत कारवाई होऊ शकणार नाही. त्यानुसार ही १६ औषधे औषधी अधिनयमातील शेड्यूल-क मध्ये तसे बदल करण्यात येतील. ओटीसी गटात येतील. साधारणतः आगामी महिनाभरात याचा अंतिम निर्णय होईल. मात्र जर नेहमीच्या औषधांनी गुण येत नसेल तर संबंधित रूग्णाने ५ दिवसांच्या कालावधीनंतर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.

ही काही औषधे होणार ‘खुली‘

  • पॅरासिटॅमॉल

  • डायक्लोफेनेक

  • सर्दीवरील नेज़ल डिकंजेस्टेंट

  • एंटी-ॲलर्जिक औषधे

  • पोव्हीडोन आयोडीन

  • क्लोरोहेक्सीडाईन (माऊथ वॉश)

  • क्लोर्टीमॅझोल

  • डेक्स्ट्रोमेथोर्फॉन

  • डिक्लोफेनॅक

  • खोकल्यावरील बेन्जॉल

  • डिफीनहायड्रामाईन गोळ्या

  • पोव्हीडोन आयोडीन

  • ॲंटी बॅक्टेरीया औषधे

  • लेक्साटिब्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

SCROLL FOR NEXT