ANI
देश

वाहनधारकांनो! लायसन, नोंदणी कागदपत्रांबाबत केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

सूरज यादव

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून याबाबतचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालायांना आदेश देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - वाहन चालकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता गाडी चालवण्याचा परवाना, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, तंदुरुस्ती प्रमाणपत्र किंवा इतर आवश्यक कागदपत्रांच्या रिन्यूसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिलं आहे. फेब्रुवारी 2020 नंतर मुदत संपलेली कागदपत्रे ज्यांना कोरोनामुळे रिन्यू करता आलेली नाहीत त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून याबाबतचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालायांना आदेश देण्यात आले आहेत.

केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 2020 नंतर आणि 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत संपणाऱ्या कागदपत्रांचीच मुदत वाढवण्यात आली आहे. त्याआधीच्या कागदपत्रांसाठी हा नियम लागू नाही. सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना सांगण्यात आलं आहे की, कोरोनामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे रिन्यू करता आलेली नाहीत अशा लोकांना अडचणी येऊ नयेत. त्यामुळे अशा कागदपत्रांसाठी कोणाला त्रास होऊ नये याची काळजी घ्या.

केंद्र सरकारने फिटनेस प्रमाणपत्र, परवाने, लायसन्स, नोंदणीच्या कागदपत्रांची मुदत वाढवली आहे. मोटर व्हेईकल अॅक्ट 1988 आणि सेंट्रल मोटर व्हेइकल रूल 1989 अंतर्गत येणाऱ्या कागदपत्रांची मुदतसुद्धा 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली असल्याचं एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. कागदपत्रे नसल्यास पाच हजार रुपयांचा आणि परवाना नसेल तर दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागतो. पोल्युशन अंडर कंट्रोल (पीयूसी) च्या सर्टीफिकेटसाठी मात्र मुदत वाढ लागू नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT