PM Modi
PM Modi  
देश

EVM वर मोदींचा फोटो नाही, मतदान करणार नाही! महिलांचे प्रेम पाहून PM मोदींच्या डोळ्यात अश्रू

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीचा (loksabha Election) प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी सहा टप्प्यातील मतदान शिल्लक राहिले आहे. पहिल्या टप्प्यातील मदतान १९ एप्रिल रोजी पार पडले. यादिवशी एक रंचक किस्सा घडला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे.

काही ग्रामीण महिला मतदान करण्यासाठी पोलिंग बुथवर आल्या होत्या. त्या जेव्हा मतदानासाठी आल्या तेव्हा त्यांना ईव्हीएमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महिलांनी बुथमधील अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. आमच्या पंतप्रधान मोदींचा फोटो यावर का नाही. मोदींनाच आम्ही मतदान करणार आहोत, असं त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदी यांनी हा किस्सा सांगितला आहे. (photo of Modi on EVM)

सदर घटना राजस्थानमधील सीकरच्या पिपरानी गावातील एका पोलिंग बुथवरील आहे. सीकर लोकसभेसाठी १९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. सकाळी अकरा वाजता महिलांचा एक गट पोलिंग बुथवर आला होता. ग्रामीण महिला गीत गात मतदान करण्यासाठी आल्या होत्या. पण, ईव्हीएमवर मोदींचा फोटो न दिसल्याने त्या हैराण झाल्या.

मतदान केंद्रात या मुद्द्यावर काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर बुथमधील अधिकाऱ्यांनी महिलांना समजावून सांगितलं की, ईव्हीएमवर पंतप्रधान मोदी यांचा नाही तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह असते. शिवाय त्यांच्या मतदारसंघातून मोदी नाही तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून दुसरा उमेदवार रिंगणात आहे. खूप समजवल्यानंतर महिलांना अधिकाऱ्यांचे म्हणणे पटले. त्यानंतर महिलांनी मतदान केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे कार्यकर्ता लक्ष्मीकांत भारद्वाज यांनी शेअर केलेलं एका वृतपत्राचं कात्रण सोशल मीडियावर रिट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदी 'एक्स' पोस्टमध्ये म्हणालेत की, माता-बघिनींचं असे प्रेम पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. माझा संकल्प हेच कर्ज फेडण्याचा आहे. पण, लक्ष्मीकांतजी आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. घरोघरी जाऊन लोकांचा जागृत करावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Wayanad: राहुल गांधींचे ठरले! अखेर वायनाडचा 'हात' सोडला

युएसएला मिळालं बक्षीस! मात्र सुपर 8 मधून बाहेर पडूनही पाकिस्तान 'या' कारणामुळं T20 World Cup 2026 साठी थेट पात्र

Samata Parishad : छगन भुजबळ वेगळी भूमिका घेणार? समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी?

T20 World Cup: अमेरिकेकडून खेळणाऱ्या हरमीतने रोहितच्या कोचला दिलं श्रेय! म्हणाला, 'त्यांनीच माझ्यात...'

Mumbai Local : गुड न्यूज! मुंबई लोकल धावणार 'टाईम टू टाईम', रेल्वेकडून 'हे' मोठे बदल

SCROLL FOR NEXT