देश

कर्नाटकात कोणतंही राजकीय संकट नाही; खुद्द मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

कोणतेही राजकीय संकट किंवा गोंधळ नाही, जे काय होत आहे ते एक-दोन लोकांमुळे

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : राज्यातील नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणतेही राजकीय संकट नसल्याचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (B.S. yediyurappa) यांनी शुक्रवारी येथे सांगितले. येडीयुरप्पा यांनी आपला मुलगा, भाजप उपाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र (B.Y. Vijayendra) यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपही खोडून काढले. "कोणतेही राजकीय संकट किंवा गोंधळ नाही. जे काय होत आहे ते एक-दोन (karnataka politics) लोकांमुळे." आमच्या माध्यमाच्या मित्रांनी गैरसमज निर्माण केला आहे, असे येडीयुरप्पा यांनी पत्रकारांना सांगितले.

जलसंपदा विभागातील २० हजार कोटी रुपयांच्या निविदेचे उदाहरण देऊन, भाजपचे ज्येष्ठ आमदार एच. विश्वनाथ (H vishawnath) यांनी गुरुवारी येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले, ते निराधार आहेत. आमचे पाटबंधारे सचिव सर्व काही स्पष्टीकरण देतील. अनावश्यकपणे हे आरोप केले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोणताही गोंधळ उरला नाही, हे सांगून येडीयुरप्पा म्हणाले, सर्व मंत्री एकत्रितपणे विकासासाठी काम करीत आहेत. कुणाच्या अनावस्यक कुरबुरीमुळे ते विचलीत झालेले नाहीत. राज्याच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी शनिवारी (१९) अतिवृष्टी होत असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओद्वारे संवाद साधणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पूर परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT