venkaiah naidu sakal
देश

शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण नको: नायडू

राजकारण केवळ राजकीय क्षेत्रातच व्हावे. सरकारला जाब विचारण्याचा हक्क जनतेला असला तरी नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

गुरुग्राम ः शेतकऱ्यांच्या समस्यांचे मतांसाठी राजकारण करू नये. त्यामुळे देशात विभाजन होईल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले.

थोर शेतकरी नेते सर छोटू राम यांच्याविषयीच्या पाच खंडांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, राजकारण केवळ राजकीय क्षेत्रातच व्हावे. सरकारला जाब विचारण्याचा हक्क जनतेला असला तरी नव्या कल्पना स्वीकारण्याची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे.

संपूर्ण देशात एकच बाजारपेठ का असू शकत नाही, असा सवाल करून ते म्हणाले की, आंध्र प्रदेशचा तांदूळ तमिळनाडूत विकला जाऊ शकत नाही हे हास्यास्पद आहे. संपूर्ण देश एकेरी अन्न विभाग असला पाहिजे आणि त्यावर कोणतीही बंधने असू नयेत. शेती शाश्वत आणि किफायतशीर ठरावी म्हणून सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब केला जावा, असेही नायडू नमूद केले.

"सर्व सरकारांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे आणि पिकांना किफायतशीर मोबदला मिळेल याची खात्री केली पाहिजे. शेतकरी आणि सरकार यांच्यात नेहमीच संवाद असला पाहिजे."

- एम. वेंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT