Corona Update 
देश

डेल्टा+ व्हेरियंटमुळे तिसरी लाट? तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

नामदेव कुंभार

डेल्टा व्हेरियंटमुळे आलेल्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहा:कार माजवला होता. आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. ऑक्सिजन, बेड आणि इतर सुविधांच्या आभावामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले होते. दुसरी लाट हळू हळू ओसरत असल्याची चित्रे दिसत असतानाच डेल्टा प्लस या नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे देशात 40 रुग्ण आढळले आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रासह केरळ आणि इतर राज्यांना अलर्ट जारी केला आहे. हे सर्व सुरु असताना सर्वसामान्यांच्या मनात तिसऱ्या लाटेची भिती निर्माण झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येणार का? असा प्रश्न विचारला जातोय. तज्ज्ञांनी यावर खुलासा केला असून डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, असे अद्याप कोणतेही पुरावे नसल्याचं सांगितलं आहे.

डेल्टा प्लस व्हेरियंट आणि भारतातील परिस्थिती यावर NDTV ने द इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स एण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) डॉ अनुराग यांची विशेष मुलाखत घेतली आहे. यामध्ये ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेची आताच काळजी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या लाटेवर लक्ष द्यायला हवं. देशात अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. ती ओसरत आहे. अशा परिस्थितीत आपण निष्काळजीपणा करु नये. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, याबाबतचे अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन काटेकोरपणे करावे.

डॉ.अनुराग अग्रवाल यांनी, सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या लाटेत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, माझ्या संस्थेमार्फत जून महिन्यात महाराष्ट्रातून 3500 चाचण्या घेण्या आल्या. ज्यामध्ये अनेक एप्रिल आणि मे मधीलही आहेत. यामध्ये डेल्टा प्लस व्हेरियंचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळलं. मात्र, हे प्रमाण एक टक्केंपेक्षा कमी आहे.

डॉ अग्रवाल म्हणाले की, डेल्टाचा कोणताही व्हेरियंट भारतासाठी चिंतेचा विषय आहे. आपली सर्वात मोठी चिंता हीच आहे की, अद्याप कोरोनाची दुसरी लाट संपुष्टात आलेली नाही. आपल्याला अजूनही सतर्कच राहावं लागेल. सर्व कोरोनाचे नियम पाळावेच लागतील. हलगर्जीपणा कोरोना महामारी वाढवू शकते. असे कोणतेही पुरावे नाहीत की, सध्या असलेला डेल्टा प्लस व्हेरियंट डेल्टा पेक्षा धोकादायक आहे किंवा यामुळे तिसरी लाट येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT