Central Railway Recruitment
Central Railway Recruitment  
देश

मोर्चे, आंदोलन कराल तर परिक्षेस अपात्र, रेल्वेची नवी नोटीस वाचली का?

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे मंत्रालयाने भरती प्रक्रियेसाठी नवी नोटीस जाहीर केली आहे. यामध्ये नव्याने काही नियम लागू करण्यात आले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या नोटीसमध्ये बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या परिक्षार्थींना रेल्वेतील नोकरीपासून वंचित रहावं लागू शकतं. म्हणजेच इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या कोणत्याही निर्णयाविरोधात अथवा भरती प्रक्रियेविरोधात भाष्य केल्यास संबंधित उमेदवाराला नोकरीच्या संधीवर आजीवन बंदी येऊ शकते.

रेल्वे मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलं आहे की, " तुम्ही रेल्वेच्या नोकरीसाठी इच्छुक असाल आणि रेल्वे ट्रॅकवर विरोध करणे, ट्रेन ऑपरेशन्समध्येव्यत्यय आणणे, रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणे किंवा रेल्वे विरोधात निदर्शने वगैरे करणे, यांसारखी कृत्य केल्यास तुम्हाला भविष्यात रेल्वेची परिक्षा देता येणार नाही. अशा कृत्यांमध्ये सहभाग असलेल्या व्यक्तींवर रेल्वेची नजर असल्याचं नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दिशाभूल करणारी कृत्य म्हणजे अनुशासन मोडण्याची सर्वोच्च पातळी आहे. अशा इच्छुकांना रेल्वे/सरकारी नोकऱ्यांसाठी अयोग्य ठरवलं जातं. या कृत्यांचे व्हिडीओ येणाऱ्या काळात विशेष एजन्सींच्या मदतीने तपासले जातील.

तसेच बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेल्या उमेदवार किंवा इच्छूकांवर पोलीस कारवाई होईल, असं रेल्वे मंत्रालयाच्या नोटीसमध्ये अंतर्भूत करण्यात आलं आहे. मोर्चे काढणारे आणि विरोध प्रदर्शन करणारे विद्यार्थी यापुढे नोकरीस आणि भरती प्रक्रियेत अपात्र ठरवले जातील, अशी माहिती रेल्वेने दिली आहे.

नोटीसमध्ये पुढे नमूद करण्यात आलं आहे की, रेल्वे भरती मंडळ (RRB) प्रामाणिकपणाचे सर्वोच्च मानक राखून निष्पक्षपणे आणि पारदर्शक भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी वचनबद्ध आहे. रेल्वेच्या नोकरीसाठी इच्छुक/उमेदवारांनी दिशाभूल करू नये किंवा अशा घटकांच्या प्रभावाखाली येऊ नये, जे त्यांचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी परिक्षार्थींचा वापर करू पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT