देश

रुग्णसंख्या वाढीमागे चाचण्यांचे कारण नाही; जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्टीकरण 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  भारतासह इतर देशांनी कोरोना चाचण्यांचा वेग वाढवला असला तरी या देशांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचे ते एकमात्र वा ठळक कारण असू शकत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ लाख ४६ हजारांवर पोचला असताना कोरोनावर मात करून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढून ५६.३८ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत देशातील आणखी सुमारे ११ हजार लोक बरे झाले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

‘डब्ल्यूएचओ’च्या आपत्कालीन आरोग्य कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रेयॉन यांनी भारतात; तसेच दक्षिण आशियाई व काही आफ्रिकी देशांमधील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर सांगितले की, भारत आणि इतर देश निश्चितपणे चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवत आहेत. मात्र कोरोना नमुन्यांच्या चाचण्या वाढवल्यामुळे रुग्णसंख्या वाढते, असे आम्हाला वाटत नाही. वाढणाऱ्या लोकसंख्येचा काही भाग दिलेल्या चाचण्यांमुळे असू शकतो, हे आम्हाला वाटते. अनेक देशांनी चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्याचवेळी रुग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्याही वाढली आहे आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडाही जगात वाढत आहे; मात्र याचे कारण चाचण्यांमध्ये झालेली वाढ हे कदापि असू शकत नाही. 

काही देशांमध्ये उद्रेकांची शक्यता 
कोरोनाची साथ यशस्वीपणे नियंत्रित करणाऱ्या देशांनी निर्बंधांमध्ये सूट देण्यास सुरुवात केल्यावर या देशांमधील आकडा झपाट्याने वाढत चालल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले. यातील काही देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक किंवा प्रचंड उद्रेक नजीकच्या काळात होऊ शकतो, असाही इशारा संस्थेने भारताचे नाव न घेता दिला आहे. 

‘आयसीएमआर’च्या माहितीनुसार... 

७१,३७, ७१६ -  २२ जूनअखेर चाचण्या 

१, ८७, २२३ -  २२ जून रोजी चाचण्या चाचण्या झाल्या. 
(आत्तापर्यंतची ही विक्रमी संख्या) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT