Azam Khan esakal
देश

Azam Khan : आझम खान यांना धक्का; आमदारकी होणार रद्द, सत्र न्यायालयाचा स्थगितीस नकार

सकाळ डिजिटल टीम

सपा नेते आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होणार हे आता निश्चित झाले आहे. रामपूरच्या सत्र न्यायालयाने आझम खान यांना सुनावलेल्या तीन वर्षांच्या शिक्षेविरुद्ध केलेले अपील फेटाळून लावले. न्यायालयाच्या या निकालामुळे रामपूर पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. या जागेची पोटनिवडणूक 5 डिसेंबरला होणार आहे.

रामपूर येथील विशेष न्यायालयाने गेल्या महिन्यात 27 ऑक्टोबर रोजी आझम खान यांना द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात दोषी ठरवून तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर, उत्तर प्रदेश विधानसभा सचिवालयाने 28 ऑक्टोबर रोजी खान यांना अपात्र घोषित करत रामपूर सदर विधानसभा जागा रिक्त घोषित केली होती.

प्रकरण नेमकं काय?

हेट स्पीटशी संबंधित हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील असून, 27 जुलै 2019 रोजी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आझम खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना पीएम मोदी आणि सीएम योगी यांच्यावर आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. याशिवाय अन्य आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. तिन्ही आरोपांमध्ये खान दोषी आढळल्याने आज त्यांना न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT