Liqour Google file photo
देश

लस नाही, तर दारू नाही; उत्तर प्रदेशमध्ये अजब कारभार

अलीगढमध्ये विषारी दारुमुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. इटावामधील सर्व दारु दुकानांची तपासणी सुरू झाली.

वृत्तसंस्था

अलीगढमध्ये विषारी दारुमुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. इटावामधील सर्व दारु दुकानांची तपासणी सुरू झाली.

इटावा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले असून आता कोरोनाची तिसरी लाट येणार असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेकडे मोर्चा वळवला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काही ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेशमधील रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) दारु विक्रेत्यांना दिलेल्या सूचनांमुळे उत्तर प्रदेश पुन्हा चर्चेत आलं आहे. (No vaccine no alcohol in UP's Etawah District)

उत्तर प्रदेशच्या इटावामधील सैफई गावातील प्रत्येक दारुच्या दुकानात एक नोटीस लावण्यात आली आहे. ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली आहे, त्यांनाच दारुची विक्री करण्यात येणार आहे. दारुची विक्री करणाऱ्या दुकानदारांना लसीकरण प्रमाणपत्र दाखविल्यानंतरच दारुची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इटावाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

अशा प्रकारचा कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दारु विक्रेत्यांना नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती इटावा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कमल कुमार शुक्ला यांनी दिली. याआधी फिरोजाबादमधील दारुच्या दुकानामध्ये अशा प्रकारची नोटीस लावल्याचे दिसून आले होते. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन दिवसात लसीकरण प्रमाणपत्र जमा न केल्यास त्यांना मे महिन्याचे वेतन देण्यात येणार नाही, असे फर्मान तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते.

दरम्यान, अलीगढमध्ये विषारी दारुमुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. इटावामधील सर्व दारु दुकानांची तपासणी सुरू झाली. पोलिस आणि स्वत: अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह देशी आणि विदेशी दारुची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पोहोचले. ग्राहकांकडे लसीकरण प्रमाणपत्र असेल, तरच दारुची विक्री केली जाईल. त्यामुळे आधी लसीकरण करा आणि मगच दारु विकत घेण्यास या, अशा सूचना विक्रेते देत आहेत.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT