देश

Amartya Sen: नोबेलविजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा; मुलीनं वृत्ताचा केला इन्कार

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तावर सेन यांच्या मुलीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याच्या वृत्ताचं त्यांची मुलगी नंदना देब सेन यांनी खंडन केलं आहे. अमर्त्य सेन यांच्या सहकारी आणि नोबेल पुरस्कार विजेत्या क्लॉडिया गोल्डीन यांनी काही मिनिटांपूर्वी ट्विट करत सेन यांचं निधन झाल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या या ट्विटच्या आधारे माध्यमांनी अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. (Nobel laureate economist Amartya Sen death report denied by his daughter)

मुलीचं स्पष्टीकरण

पण माध्यमांमध्ये आपल्या वडिलांचं निधन झाल्याच्या बातम्या आल्याचं कळताच अमर्त्य सेन यांची कन्या नंदना देब सेन यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. आपल्या वडिलांचं निधन झालेलं नाही, त्यांची प्रकृती ठीक असल्याचं त्यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

निधनाची केवळ अफवाच

क्लॉडिया गोल्डीन यांच्या व्हेरिफाईड नसलेल्या अकाऊंटवरुन अमर्त्य सेन यांच्या निधनाबाबत ट्विट करण्यात आलं होतं. हे ट्विटही नंतर डिलीट करण्यात आलं, त्यामुळं अमर्त्य सेन यांचं निधन झाल्याची केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट झालं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT