Bajrang Dal Sakal
देश

बलात्काराच्या आरोपीला वाचवण्यासाठी बजरंग दलाचा गोंधळ; पोलिसांना मारहाण

बलात्कार प्रकरणातला आरोपी सनी याला वाचवण्यासाठी बजरंग दलाचा नेता गंगा याच्या नेतृत्वाखाली ५०-६० लोक पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशातल्या नोएडामध्ये बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या लोकांनी गोंधळ केला. तसंच त्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात साधारण ६० जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अपर पोलीस उपायुक्त रणविजय सिंह यांनी सांगितलं की, सदरपूर कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका युवतीवर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी सनी नामक एका आरोपीला अटक केली होती. या सनीला सोडवण्यासाठी बजरंग दलाचा नेता गंगा याच्या नेतृत्वाखाली ५०-६० लोक पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी तिथे गोंधळ घालण्यास सुरूवात केली.

जेव्हा पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा या लोकांनी पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी गंगासह इतर ५०-६० अज्ञान युवकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction: सोनं वर्षाअखेरीस 500 डॉलरने स्वस्त होणार? Goldman Sachs चा धक्कादायक अंदाज

Kisan Credit Card Rule: किसान क्रेडिट कार्डचे नियम बदलले! शेतकऱ्यांना आता सहज कर्ज मिळणार; कागदपत्रांची कटकट कमी, RBI चा मोठा निर्णय

सिनेमापलीकडचा माणूस! जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या चिमुकलीसाठी अल्लू अर्जुनने पुन्हा म्हटला 'पुष्पा'चा डायलॉग

IND vs AFG, 3rd ODI: प्रसिद्ध कृष्णाच्या ५ विकेट्स, पण अफगाणिस्तानचा कर्णधार एकटा लढला अन् शतकासह भारतासमोर उभं केलं लक्ष्य

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT