Case of rape sakal media
देश

नोएडा : अप्लवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार केल्याप्रकरणी तरुणाला अटक

नरेश शेंडे

नोएडा : एका १३ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार (minor girl sexual assault and abduction case) केल्याची धक्कादायक घटना नोएडाच्या (Noida) सेक्टर १४२ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलीय. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत (pocso act) आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रमोद असं आरोपीचं नाव असून तो इलेक्ट्रेशीयन आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी प्रमोद फरार झाला होता. मात्र गुरुवारी गौतम बुद्ध नगर पोलीसांनी आरोपीचा शोध घेवून त्याला अटक (culprit arrested) केली आहे. पीडित मुलीच्या शेजारीच आरोपी प्रमोद राहत होता. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (Noida police arrested a culprit in minor girl abduction and sexual assault crime)

याबाबत सविस्तर वृत्त असं की, रविवारी सायंकाळी पीडित मुलगी एका दुकानात जात असताना आरोपी प्रमोदने तिचं अपहरण केलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने तिच्यासोबत घडलेली घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर १२ जानेवारीला बुधवारी नोएडाच्या सेक्टर १४२ पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या मोठ्या भावाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी विरोधात या प्रकरणी आयपीसीच्या सेक्शन ३७६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

"गुन्हा करुन फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलीसांचं पथक तयार करण्यात आलं होतं. मात्र पोलीस आरोपीच्या शोधावर होते त्यामुळे नोएडाच्या सेक्टर १४३ मेट्रो स्टेशन परिसरात गरुवारी आरोपीला पकडण्यात यश आलं. अशी माहिती सेक्शन १४२ पोलीस स्टेशनचे एसएचओ उत्तम कुमार यांनी दिलीय. दरम्यान, आरोपीवर फेब्रुवारीत गाझियाबादच्या विजय नगर पोलीस स्टेशनमध्ये २० वर्षीय महिलेचं अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशी माहितीही पोलिसांच्या तपासात समोर आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT