Manoj Tiwari and Kanhaiya Kumar sakal
देश

North East Delhi Loksabha Election : दंगलीचा फटका नेमका कुणाला?

चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीच्या फटका बसलेला बहुतांश भाग ईशान्य लोकसभा मतदारसंघात येतो.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या जातीय दंगलीच्या फटका बसलेला बहुतांश भाग ईशान्य लोकसभा मतदारसंघात येतो.

हा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. या मतदारसंघाचे पहिल्यांदा प्रतिनिधित्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश अग्रवाल यांनी केले. परंतु २०१४ व २००१९ मध्ये या मतदारसंघात भाजपने आपली भक्कम पकड केली आहे. पूर्वांचली, मुस्लिम, दलित आणि उत्तर प्रदेशातून कामासाठी आलेल्या कामगारांचा या मतदारसंघांवर प्रभाव आहे.

प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते मनोज तिवारी यांनी गेल्या दहा वर्षांत या मतदारसंघावर चांगलीच पकड मिळवली आहे. तिवारी हे यावेळीसुद्धा पूर्वांचली मतदारांच्या भरवशावर अवलंबून आहे. तर काँग्रेसनेसुद्धा बिहारमधील मूळ असलेले व विद्यार्थी चळवळीतून राजकीय जीवनात प्रवेश केलेले कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीने भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

२०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या आठवणी अजूनही या मतदारसंघांत ताज्या आहेत. याचा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे. या भागात मुस्लिम मतदारांची संख्या २३ टक्के आहे. त्याचप्रमाणे दलित मतदारांची संख्या १६ टक्के आहेत.

या मतदारांवर काँग्रेसची सारी भिस्त आहे. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचा आमदारही येथे नसल्याने येथे काँग्रेसचे संघटन कमजोर असल्याचा फटका कन्हैया कुमार यांना बसत आहे.

या भागातील दहा विधानसभा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघात आपचे आमदार असले तरी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात ‘आप’च्या कार्यकर्त्यांचा तेवढासा सहभाग नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मात्र कन्हैया कुमार यांचा प्रचार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT