delhi rain 
देश

दिल्लीत पावसाने वाढवला थंडीचा कहर; आंदोलनातील शेतकरी मागण्यांवर ठाम

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर भारतात शीतलहर तर जोरदार आहे. मात्र त्यातच आता शनिवारी अनेक ठिकाणी पावासाच्या हलक्या सरी आणि बर्फवृष्टी झालेली पहायला मिळाली. आज रविवारी राजधानी दिल्लीमध्ये देखील पाऊस पडलेला पहायला मिळाला. यामुळे थंडीत वाढ झाली. दिल्लीच्या अनेक भागात शनिवारी सकाळी रिमझिम पाऊस पहायला मिळाला. मात्र, ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान 7 डिग्री सेल्सियस झाले. तर हिमाचल प्रदेशातील केलांगमध्ये तापमान शून्याच्या खाली -7.3 डिग्री सेल्सियस राहिले. याबाबतची माहिती हवामान खात्याने दिली आहे. दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात रविवारी वीजांच्या कडकडासह पाऊस झाला. हवामान खात्याने आधीच याबाबतची पूर्वसूचना दिली होती. दिल्लीच्या उत्तर पश्चिम भागात, उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद, नॉयडासहित हरियाणाच्या काही भागांमध्ये पाऊस पडतो आहे.

शेतकरी आंदोलन सुरुच
दिल्लीत कडाक्याची थंडी आपला कहर दाखवत आहेच. मात्र, त्यातच सुरु झालेल्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. असं असतानाही आपल्या मागण्यांसाठी ठाम असलेल्या शेतकऱ्यांच्या निश्चयामध्ये कसलाही फरक पडला नाहीये. या परिस्थितीत देखील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी म्हटलंय की, अशा प्रतिकूल हवामानात आम्ही रस्त्यावर राहतो आहोत. सरकार आमच्या मागण्या उद्या मान्य करेल अशी आशा आम्हाला आहे. 

प्रदुषण अद्याप कायम
सलग पाऊस पडत असूनही सलग दुसऱ्या दिवशीही राजधानी दिल्लीच्या प्रदुषणामध्ये काहीही घट झालेली नाहीये. शनिवारी देखील प्रदुषणाची  पातळी तीव्र  होती. मात्र, आज प्रदुषणापासून मुक्ती मिळण्याची आशा आहे. 

हेही वाचा - भारताला मोठं यश; कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला 'कल्चर' करणारा पहिला देश​
धुक्यात अडकली दिल्ली
दोन दिवसांपासून दिल्लीमध्ये प्रदुषणामुळे मोठ्या प्रमाणावर धुके दाटलेले आहे. यामुळे लोकांना डोळ्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. छातीत जळजळ यांसारख्या समस्यांसह डोकेदुखी देखील होत आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीमुळे त्रासात आणखी भर पडत आहे. नव्या वर्षाची सुरवात गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वांत प्रदुषित झाली आहे. त्यात पावसामुळे प्रदुषणास कारणीभूत घटक हे हवेतून खाली आले. त्यामुळे त्रास आणखी वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागले! काय आहे तुमच्या शहरातील आजचे दर

मोठी बातमी! ३१ जुलैपूर्वी १५ हजार शिक्षकांची भरती; भरतीत खासगी शिक्षण संस्थेच्या हाती अवघे १० गुण, ९० गुण उमेदवाराचे ‘टीईटी’चे गुण अन्‌ पात्रतेला

Video viral: मोदींच्या आवाहनानंतर अर्थमंत्री सायकलवरून पोहचले विधानसभेत; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात केवळ २ गाड्या!

Panchang १५ मे २०२६ : आजचे पंचांग!शिवरात्री, अमावस्या, राहुकाळ आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 15 मे 2026

SCROLL FOR NEXT