देश

'कॉलेज विद्यार्थ्यांना लस घेण्याचे बंधन नाही'

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : उच्च शिक्षण विभागाने जुलै महिन्यात पात्र विद्यार्थ्यांना कोविड -१९ ची (covid-19 vaccine) लस देण्याची आणि ऑगस्टमध्ये वर्ग पुन्हा सुरू करण्याचे नियोजन केले असले तरी विद्यार्थ्यांना लस घेणे बंधनकारक (college students) नाही. उच्च शिक्षण विभाग कोणत्याही विद्यार्थ्यांना लस घ्यायला भाग पाडत नाही. इच्छा असेल तरच ते लस घेऊ शकतात, असे उच्च शिक्षण मंत्री व उपमुख्यमंत्री डॉ. सी.एन. अश्वथ नारायण (C.N ashwath narayan) यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विद्यापीठ कुलगुरूंच्या आभासी बैठकीत विद्यार्थ्यांना ७ जुलैपूर्वी लस देण्याचे आवाहन त्यांनी केले. (not-compulsory-for-college-students-vaccine-of-covid-19)

शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २८ जूनपर्यंत ९४ हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना लस देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लसीकरणानंतर विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गात जाणे बंधनकारक नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन वर्गात (online education) प्रवेश घेण्याचे पर्याय असतील. महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्राधान्य गट म्हणून लस दिली जात आहे. या लसीकरण मोहिमेच्या यशावर ऑफलाइन वर्ग सुरू होण्याची तारीख अवलंबून असून यासंदर्भात सरकार सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, असे मंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT