PM Modi Esakal
देश

PM Modi : मोदी है तो मुमकीन है! आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान

आतापर्यंत नऊ देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसांपासून विदेशी दौऱ्यावर आहेत. यावेळी अनेक देशांच्या प्रतिनिधी आणि नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे.

आतापर्यंत नऊ देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना 'अब्दुलाझीझ अल सौद' हा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

2016 साली मोदींना 'अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार' या अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. या पुरस्काराचे नाव अफगाणिस्तानचे राष्ट्रीय प्रमुख अमानुल्लाह खान (गाजी) यांच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे.

2018 साली मोदी फिलिस्तीनच्या दौऱ्यावर असताना त्यांना 'ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन' पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर 2019 साली संयुक्त अरब अमीरातला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ जायद' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

2019 साली रशियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ सेंट अँड्रयू'ने मोदींना सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर मालदीवने 'निशान इज्जुद्दीन' या सर्वोच्च पुरस्काराने मोदींना सन्मानित केलं आहे. बहरीनने 2019 साली हमाद 'ऑर्डर ऑफ दि रेनेसां', 2020 साली अमेरिकेने 'लीजन ऑफ मेरिट’पुरस्काराने सन्मानित केलं. तर भूतानने 2021 साली मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार 'ऑर्डर ऑफ दी ड्रक गियल्पो' पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यानंतर आता परदेशी दौऱ्यावर असताना फिजी आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी त्यांचा सन्मान केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT