rajnath singh.png 
देश

जगातील कोणतीही शक्ती इंच भूभागही आपल्यापासून घेऊ शकत नाही- राजनाथ सिंह

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

लेह- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी लेह दौऱ्यावर आहेत. 15 जून रोजी सीमेवर झालेल्या संघर्षानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गेले आहेत. चर्चेच्या माध्यमांतून आपण वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण कुठंपर्यंत सर्व प्रश्नांचे समाधान होईल, हे सांगता येत नाही. पण मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो.जगातील कोणतीही शक्ती भारताचा इंच भूभागही आपल्यापासून घेऊ शकत नाही, असं सिंह म्हणाले आहेत. ते सैनिकांशी संवाद साधत होते.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे उद्यापासून ‘अनलॉक’
भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याने सर्व जगाला शांततेचा संदेश दिला आहे. आम्ही कधीच कुणा देशावर हल्ला केला नाही किंवा दुसऱ्या देशाचा भूभाग आमचा असल्याचा दावा केला नाही. जग हेच एक कुटुंब आहे, या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो, असं राजनाथ सिंह म्हणाले. आम्हाला आमच्या देशाच्या सैनिकांवर गर्व आहे. आज मी जवानांमध्ये उभा असल्याचा मला अभिमान वाटतो. जवानांनी देशासाठी आपला जीव पणाला लावला असल्याचं ते म्हणाले.

आज मी लडाखमध्ये उभा आहे. ज्या सैनिकांनी कारगिल युद्धादरम्यान आपला प्राण गमावला त्यांना मी श्रद्धांजली वाहतो, असं सिंह म्हणाले. राजनाथ सिंह यांच्यासोबत संरक्षण प्रमुख बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख एम. एम. नरवणे हेही त्यांच्यासोबत आहेत. सिंह दोन दिवसांच्या  लडाख-जम्मू काश्मिर दौऱ्यावर आहेत. संरक्षण कार्यालयाने यासंबंधिचे काही छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहला अनपेक्षितपणे भेट दिली होती. त्यांनी जवानांना संबोधित करताना चीनला सज्जड इशारा दिला होता. आता विस्तारवादाचे युग संपले आहे, आता विकासाचे युग आहे. इतिहास साक्षी आहे की विस्तारवादामुळे मानवजातीचं नुकसानच झालं आहे. त्यामुळे विस्तारवाद सोडून देशाने शांतीचा मार्ग अवलंबवावा, असं ते म्हणाले होते.

भारत आणि चीन देशांमधील निवळत असलेला तणाव पुन्हा वाढला
दरम्यान, 15 जून रोजी पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान रक्तरंजित संघर्ष झाला होता. यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनने आपली हानी जाहीर करण्यास नकार दिला आहे. संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक स्फोटक बनले आहेत. दोन्ही देशांमध्ये कमांडर जनरल स्तरावर चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांनी लडाखच्या काही भागातून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, काही भागातून चीनने माघार घेण्यास नकारात्मकता दाखवल्याचं कळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

Young Officer ACB Trap : निवडणूक काळातील बिलासाठी तरूण अधिकाऱ्याने तब्बल ५० हजार लाच घेतली, एसीबीने आवळल्या मुसक्या, जतमधील घटना

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना ! जिम मालकावर चार अल्पवयीन मुलांनी झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण आले समोर

FIFA World Cup 2026: अमेरिकेत युरोपियन क्रांतीची चाहूल! फ्रान्स, स्पेन, इंग्लंडमध्ये रस्सीखेच, तर अर्जेंटिना, ब्राझीलचा लागणार कस

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

SCROLL FOR NEXT