

FIFA World Cup 2026
Sakal
फुटबॉल विश्वकरंडकात युरोप व दक्षिण अमेरिका या खंडातील देशांचेच वर्चस्व आतापर्यंत राहिले आहे. युरोपियन खंडातील देशांनी १२ वेळा आणि दक्षिण अमेरिका खंडातील देशांनी दहा वेळा स्पर्धा जेतेपद पटकावण्याची किमया करून दाखवली आहे. यंदाच्या विश्वकरंडकातही युरोपियन देशांचाच बोलबाला राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फ्रान्स, स्पेन, इंग्लंड, पोर्तुगाल या युरोपियन देशांकडे अजिंक्यपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. गतविजेता अर्जेंटिनाकडून अपेक्षा आहेत. ब्राझील व जर्मनी या माजी विजेत्यांमध्ये रणांगणात ठसा उमटवण्याची धमक आहे.