a tentative image of XE
a tentative image of XE google
देश

कोरोनाच्या XE व्हेरिएंटला घाबण्याचे कारण नाही; NTAGI प्रमुखांची माहिती

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशातील कोरोना रूग्ण (Corona Cases In India) कमी झाल्यानंतर राज्यसह देशातील जवळपास सर्व कोरोना निर्बंध मागे घेण्यात आले आहे. त्यानंतर. काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाचा नवीन (COrona New Variant) व्हेरिएंट XE चे रूग्ण आढळून आले आहेत. मात्र, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटला नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याची दिलासादायक माहिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे प्रमुख (NTAGI) एन. के. अरोरो यांनी दिली आहे. सध्याच्या घडली भारतात आढळून येत असलेल्या रूग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तो वेगाने पसरत असल्याचे दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (NTAGI Chief On XE Variant Of Covid)

नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनचे (NTAGI) प्रमुख अरोरा म्हणाले की, कोरानाच्या XE व्हेरिएंटमुळे रूग्णांमध्ये गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळून येत नाहीयेत. तसेच भारतात ज्या पद्धतीने रुग्णांची संख्या आढळून येत आहे. त्यानुसार हा व्हेरिएंट देशामध्ये वेगाने पसरत नसल्याचे दिसून येत आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनाचा यापूर्वी आढळून आलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटमधून नव्या व्हेरिएंटची निर्मिती होत असून, XE हा व्हेरिएंट इतर X मालिका आणि त्यासारख्या व्हेरिएंटचा एक भाग आहे. अशा पद्धतीचे व्हेरिएंट येतत राहतील. मात्र, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

मुंबईत आढळला कोरानाचा XE रूग्ण; BMC ची माहिती

मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसच्या XE प्रकाराच्या व्हेरिएंटची (Corona XE Variant) लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती, बीएमसीने (BMC) दिली आहे. सांताक्रूझ (SantaCruz) उपनगरातील रहिवासी असलेल्या 67 वर्षीय आणि पूर्ण लसीकरण झालेल्या पुरुषाला याची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आढळून आलेला व्हेरिएंट यापूर्वी आढळून आलेल्या ओमिक्रॉनपेक्षा (Omicron) 10 पट जास्त संक्रमणक्षम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. (XE variant Of Coronavirus Confirmed In Mumbai)

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, XE व्हेरिएंटची लागण झालेली व्यक्ती 11 मार्च रोजी वडोदरा (Vadodara) येथे गेली होती. त्यावेळी एका हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान संबंधित व्यक्तीची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट (Corona Test) केली असता ती पॉझिटिव्ह आली. मात्र, लक्षणे दिसत नसल्याने ही व्यक्ती मुंबईला परतली. मात्र, ज्यावेळी संबंधित व्यक्तीच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) केले गेले तेव्हा या व्यक्तीला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE ची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे या व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण (Corona Vaccination) झालेले असून, त्याला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षण दिसून येत नसून संबंधित व्यक्ती पूर्णपणे स्थिर असल्याचे बीएमसीने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT